वालचंदनगर पोलीस स्टेशन मधील ग्राम संरक्षक दलाचे काम कौतुकास्पदnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnवालचंदनगर पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण ३९ गावे ११ वाड्या वसत्या असे एकूण ५५० ग्राम संरक्षक पथके ५० गावातून १०ते १५ सदस्य असे निवड करून घेतले होते सदर सदस्यांना पोलीस स्टेशन कडून त्या सदस्यांना टी शर्ट लाठी बॅटरी शिट्टी असे वाटप सामाजीक कार्यकर्ते यांचे कडून देण्यात आले. दि २९ / ६ / २०२२ रोजी वार बुधवार या दिवशी दुपारी ४ वाजता जगतगुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा आला होता भवानीनगर येथे त्यावेळी पालखी चे स्वागत करते वेळी आमदार दत्तात्रय भरणे, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, बारामतीचे अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बी एन लातूरे, छत्रपती कारखान्याचे चेअरमन प्रशांत काटे अशा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ग्राम संरक्षक दलाने आपली स्वागताची उपस्थिती चांगली केल्याने हद्दीत कोठेही कसलाही अनुचीत प्रकार घडला नाही. ग्राम संरक्षक दलामुळे मोबाईल मौल्यवान वस्तू अशी कोणतेही चोरी होवू शकली नाही सुखरूप पालखी रवाना झाली आहे.nसदर ग्राम संरक्षक दलाचे कार्य सहा फौजदार रतिलाल चौधर यांनी पाहीले. पोलीस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख यांचे मार्ग दर्शनाखाली अपर पोलीस अधिक्षक बारामती मिलींद मोहीते उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे सहा पोलीस निरिक्षक बीएन लातुरे PSI खंदारे वालचंदनगर पोलीस स्टाफ यांनी लक्ष घालून सदरचा बंदोबस पार पाडला. लातुरे यांनी तसेच हद्दीमध्ये विविध प्रकारच्या संतांच्या पालख्या येत असल्याने त्यांचाही बंदोबस अतिशय चांगल्या पद्धतीने केला. सर्व पंचक्रोशीतील नागरिकांनी ग्राम संरक्षक पथक, पोलीस पाटील आणि वालचंदनगर पोलीस स्टेशन चे कार्य कौतुकास्पद आहे अशी चर्चा होवू लागली आहे.
Related Posts
आधार कार्ड क्रमांक आणि नावनोंदणी आय.डी. हरवलाय? काळजी नको, ’या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो
आधार कार्ड क्रमांक आणि नावनोंदणी आय.डी. हरवलाय?nकाळजी नको,n’या’ सोप्या स्टेप्स करा फॉलोnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क…
रेल्वे कार्यालयात सौर ऊर्जेचा प्रकाश, सौर ऊर्जा यंत्रणा कार्यान्वित , वर्षांला १.४६ लाख युनिट वीज
रेल्वे कार्यालयात सौर ऊर्जेचा प्रकाश,nसौर ऊर्जा यंत्रणा कार्यान्वित ,nवर्षांला १.४६ लाख युनिट वीजnn( शिव-कल्याण न्युजnnपुणे…
सातारा जिल्ह्यातील जिहे – कटापूर योजनेचे कोरेगांव-खटाव चे आमदार महेश शिंदे यांनी गनिमी काव्याने केले उदघाटन
nnसातारा जिल्ह्यातील जिहे – कटापूर योजनेचे कोरेगांव-खटाव चे आमदार महेश शिंदे यांनी गनिमी काव्याने केले…