Uncategorized

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण! बारामती न्यायालयाकडून आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण!nnबारामती न्यायालयाकडून आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षाn

सचिन तरंगे ( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

nसहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस बारामती येथील अपर जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा “पोक्सो कायद्या अंतर्गत” सुनावली आहे.nnयाप्रकरणी दौंड तालुक्यातील पिलानवाडी येथील आरोपी अनिल बबन बनकर ला नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. असा बारामती येथीलअपर जिल्हा व सत्र न्यायालयाने हा महत्वपर्ण निर्णय दिला आहे.nn18 जून 2020 साली हा गुन्हा घडला होता.nnदौंड तालुक्यातील पिलानवाडी गावातील 6 वर्षीय मुलीवर अनिल बनकर ने लैंगिक अत्याचार केला होता.nnपीडितेची आई भाजीपाला आणण्यासाठी गेल्याचा आरोपीने फायदा घेत 6 वर्षांच्या मुलीला पोल्ट्रीत नेऊन लैंगिक अत्याचार केला होता.nnया प्रकरणी मुलीच्या आईने दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.nnत्यानुसार पोलिसांनी दोषारोपपत्र बारामती कोर्टात दाखल केल होतं.nnआई फितूर:-nnत्यानंतर मुलीची आई न्यायालयात फितूर झाली.nnपरंतु अत्याचार झालेल्या चिमुरडीने कोर्टात साक्ष दिली. चिमुरडीने साक्ष बदलली नाही.nnयाप्रकरणी बाल लैंगिक अत्याचार कलम 4,6,20,12 सह भादवी कलम 376, 504, 506 प्रमाणे शिक्षा सुनावण्यात आली आहे. मरेपर्यंत जन्मठेप तसेच 10 हजार रुपयांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *