राज्यमंत्री दत्तात्रय भरणे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत बिनविरोध……nn
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूक रिंगणातून माघार घेण्यासाठी बुधवार, दि. २२ रोजी शेवटचा दिवस होता. इंदापूर ब वर्ग मतदार संघातून इतर उमेदवारांनी माघार घेतल्याने विद्यमान संचालक राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला .nnराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गेली २५ वर्षे संचालक म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत काम केले आहे. यापुर्वी त्यांनी बँकेत चेअरमन म्हणून काम पाहीले आहे .nnराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा आलेख सतत वाढत राहीला आहे.nछत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदापासून सुरू झालेली त्यांची राजकीय कारकीर्द जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा परिषद, विधानसभा यासह सध्या विविध ६ खात्यांचे राज्यमंत्री पद अशी जबाबदारी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे ( मामा ) पार पाडत आहेत.