Uncategorized

मुंबई जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचे”प्रवीण दरेकर”यांना शिवसेनेची मदत!

मुंबई जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचे”प्रवीण दरेकर”यांना शिवसेनेची मदत!nnसचिन तरंगे( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnराज्यात सद्या मुंबई जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.nमुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील संचालकपद निवडणुकीच्यानिमित्ताने राज्यात अनपेक्षित राजकीय समीकरणे जुळून येताना दिसत आहेत. ही समीकरणे जुळत असताना राज्यात सत्तेत असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष मुंबै बँकेच्या निवडणुकीत एकत्र आले आहेत आणि तेही भाजपबरोबर एकत्र आले आहेत.nnनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी हे ‘तीनही पक्ष सरसावले आहेत.nnभाजप नेते आणि विरोध पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या मदतीला शिवसेना धावून आली आहे. मुंबई जिल्हा बँक निवडणुकीत प्रविण दरेकरांचं अस्तित्व टिकवण्यासाठी शिवसेनेने माघार घेतली आहे.nnनागरी बँक गटातून प्रविण दरेकर यांच्यासाठी शिवसेनेच्या अभिजीत अडसूळ यांनी माघार घेतली आहे.nnमजूर संस्था गटातून विरोधकांनी उमेदवारीला आक्षेप घेतल्यानं प्रविण दरेकरांची उमेदवारी धोक्यात आली होती.nnसहकार विभागानेही याप्रकरणी प्रवीण दरेकर यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलं आहे. प्रविण दरेकरांनी मजूर संस्था गट आणि बँकींग गट अशा दोन गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.nnपण मजूर संस्था गटातून उमेदवारीला आक्षेप घेतल्याने प्रवीण दरेकर आपला अर्ज मागे घेतील.nnपण नागरी बँक गटातून आता शिवसेनेच्या अभिजीत अडसूळ यांनी माघार घेतल्यानं प्रविण दरेकर यांची या गटातून बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.nnअभिजीत अडसूळ हे सेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे पूत्र असून ते सध्या ईडीच्या रडारवर आहेत.nnअभिजीत अडसूळ यांना मुंबई जिल्हा बँकेत स्विकृत संचालक म्हणून घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती मिळतेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *