Uncategorized

गृहमंत्री “अमित शाहांचा” मुक्काम “अजित पवारांच्या” ‘सूट’ मध्ये !

गृहमंत्री “अमित शाहांचा” मुक्काम “अजित पवारांच्या” ‘सूट’ मध्ये !

nसचिन तरंगे ( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह हे अहमदनगरमधील प्रवरानगर ‘ सहकार परिषदेसाठी उपस्थित आहेत.nnते सायंकाळी ते पुण्यात दौऱ्यावर येणार आहेत.महाराष्ट्राचे उमुख्यमंत्रीnअजित पवार यांनी स्वत: साठी राखीव असलेला “सूट” गृहमंत्री अमित शहा यांच्या साठी दिला आहे.nnकेंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या कार्यालयानं खासगी ठिकाणी मुक्कामाची सोय नको असं पुणे जिल्हा प्रशासनाला कळवलं होतं.nnपुण्यातील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊसमध्ये दोन सुट आहेत,त्यापैकी एक सुट कायमस्वरूपी मुख्यमंत्र्यांना राखीव असतो. तर,दुसरा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासाठी राखीव असतो. अजित पवार याच दालनात अजित पवार बैठक घेत असतात. मात्र, अमित शाह यांच्या कार्यालयाकडून खासगी हॉटेलमध्ये मुक्काम नको हे कळवल्यावर ही गोष्ट उपुख्यमंत्री अजित दादांच्या कानावर जाताच त्यांनी त्यांचा “सूट” अमित शहांना मुक्कामासाठी दिलाय.nnस्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “व्हीव्हीआयपी सर्किट”हाउसमध्ये त्यांच्या ताब्यातील “सूट”उपलब्ध करून दिलाय.nnअजित पवार हे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असल्याने हा सूट त्यांना देण्यात येतो.nnअजित पवार दर शुक्रवारी, शनिवारी याच ठिकाणी बैठका घेतात.nnपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं “केंद्रीय सहकार”मंत्रालयाची स्थापना केली.nत्यानंतर त्याची जबाबदारी अमित शाह यांच्याकडे देण्यात आली. अमित शाह यांनी केंद्रीय सहकार मंत्रालयाची जबाबदारी स्वीकरल्यानंतर ते पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *