Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

पाटबंधारे विभागाने रस्ता खोदल्याने रस्ता व प्राथमिक शाळा बंद!

पाटबंधारे विभागाने रस्ता खोदल्याने रस्ता व प्राथमिक शाळा बंद!nnसचिन तरंगे ( शिव-कल्याण न्युज नेटवर्क)nnरेडणी गावच्या हद्दीत काळकुटे वस्ती येथील प्राथमिक शाळेजवळ रेडणी खोरोची रस्ता पाटबंधारे विभागाने रस्ता खोदल्याने वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे.nnविशेष म्हणजे हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचा आहे,प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक अवर्तनासाठी हा रस्ता खोदला जात आहेnnया रस्त्या नजीक काळकुटे वस्ती येथिल जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे,या शाळेत इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतची मुले शिक्षण घेत आहेतnnया लहान मुलांना या रस्त्यावर असणाऱ्या पुलावरूनच शाळेत जायला व यायला एकमेव मार्ग आहे,nnराज्यात कोविड19 च्या साथ रोगाची भयानक स्थिती व लोकडाऊन असल्याने गेली 22 महिने या शाळा बंद होत्या, नुकत्याच शासन निर्णय नुसार 1 डिसेंबर 2021 पासून शाळा चालूnझाल्या आहेत, पाटबंधारे विभागाच्या मानवनिर्मित चुकीमूळे पहिल्याच दिवशी शाळा बंद ठेवण्याची दुर्दैवी घटना घडली आहे, अशा प्रकारे रस्ता खोदून त्यातून आवर्तन देण्याचा प्रकार गंभीर आहे, सध्या या कॅनल मधून अतिशय वेगाने पाण्याचा प्रवाह वाहत असल्याने विद्यार्थ्यांच्या ‘जीवितास धोका’निर्माण झाली आहे, अशी सध्याची परिस्थिती आहे, याचे गांभीर्य पाटबंधारे विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.nnरेडणी खोरोची रस्त्यावरील हा पूल कोणी बांधायचा, बांधकाम विभाग की पाटबंधारे विभाग या वरून या दोन विभागात एकमत नसल्याचे गेल्या दोन तीन वर्षांपासून दिसून येते आहे,nnचालू आर्थिक वर्षात बांधकाम विभागाने या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण केले आहे, परंतु या रस्त्यावरील ‘पुला’ चे काम केले नाही,नेमके ह्या पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग की पाटबंधारे विभाग करणार या बाबत निर्णय होतं नाही,त्यामुळेच हा विषय प्रलंबित आहेnnहा रस्ता खोदण्यास बांधकाम विभागाची परवानगी घेतली नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे किशोर साळुंखे यांनी सांगितले,पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.nnबांधकाम विभाग आणि पाटबंधारे विभागाच्या वादाने मुळे रेडणी येथील काळकुटेवस्ती वरील साडेतीनशे शेतकऱ्यांना नाहक त्रास होत आहे.nरेडणी ,ता. इंदापूर ,जि. पुणे येथील खोरोचीकडे जाणारा रस्ता व खोरोची वरून रेडणीकडे येण्यासाठी शेतकरी ,व्यापारी, व नागरिकांसाठी व नीरा नदीकाठच्या ७ ते ८ गावासाठी आणि हा शिंगणापूर नातेपुते, पळसमंडळ, जाण्यासाठी जवळचा असल्याने वाहतूक साठी महत्त्वाचा आहे .nnरेडणी वरुन खोरोची कडे जाणारा ह्या रस्त्याचे काही महिने झाले रस्त्याचे काम चालू असताना पूल बांधला गेला नाही.nnबांधकाम विभागाचे अधिकारी , कॉन्ट्रॅक्टदार म्हणतात पाटबंधारे विभागाने बांधावा आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी म्हणतात बांधकाम विभागाने बांधावा या दोघांच्या वादामुळे रेडणी काळकुटे वस्ती वरील तीनशे ते साडेतीनशे शेतकरी, मजूर ,दूध उत्पादक ,नागरिकांना मुला-मुलींना कॉलेज, विद्यालय जाण्यासाठी दोन किलोमीटर अंतर जाण्यासाठी पाच ते सहा किलोमीटर वळसा घालून निरवांगी, मानेवस्ती खोरोची व काळकुटे वस्ती येथील शेतकऱ्यांना जावे लागते .nगेले सात-आठ महिने हा नाहक त्रास, मुस्कटदाबी या दोन्ही विभागामुळे शेतकऱ्यांची होत आहे याबाबत तेथील शेतकऱ्यांच्या तीव्र भावना आहेत.nnज्यावेळेस १८(अठरा) व इतर फाट्याला पाणी येते त्यावेळेस आणि रेडणी व आजूबाजूतील नागरिकांना, शेतकऱ्यांना खोरोची कडे जाण्यासाठी निरवांगी, माने वस्ती मार्गे सहा किलोमीटर वळसा घालावा लागतो याला जबाबदार कोण ? आंधळं दळतं कुत्र पिठ खाते अशी बांधकाम विभाग आणि पाटबंधारे विभागाची परिस्थिती असून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क केला असता तात्काळ काम करतो, आम्ही बघतो अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.nnया पुलाचे बांधकाम तातडीने करावे अन्यथा ग्रामस्थांना आंदोलन करण्याचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा ‘इशारा ‘ग्रामस्थांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *