परांजपे मोतीवाले हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप!nभुदरगड तालुका गावकरी मित्र मंडळाचा उपक्रम!
nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnचिपळूण जिल्हा रत्नागिरी येथील परांजपे मोतीवालेहायस्कूल मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला.nभुदरगडतालुका गावकरी मित्र मंडळाने महापूर ग्रस्त विद्यार्थ्यांना ‘ परीक्षा पॅड,रंगपेटी,वह्या,पाण्याची बाटली स्केच पेन,जेवणाचा डबा,वस्तू स्वरूपातील ही मदतिचे वाटप करण्यात आले.nया कार्यक्रमास संस्था कार्याध्यक्ष सौ सई वरवाटकर अर्पणा मेहंदळे, पर्यवेक्षक सुरेश पळसे,मुख्याध्यापक सुभाष जाधव, इत्यादि मान्यवर उपस्थित होते.nभुदरगड तालुका गावकरी मित्र मंडळाचा उपक्रमाचे कौतुक आणि आभार परांजपे मोतीवालेहायस्कूल च्या प्रशासनाने मानले.nयावेळी शंभर हून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य चे वाटप करण्यात आले.