Uncategorized

प्रशांत चव्हाण सहाय्यक आयुक्तपदी रुजू

प्रशांत चव्हाण सहाय्यक आयुक्तपदी रुजूnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnराणी मुक्कावार यांचे बदलीने रिक्त झालेल्या जागी प्रशांत चव्हाण हे सहाय्यक धर्मादाय आयुक्त म्हणून रुजू झाले आहेत. यामुळे पुणे विभागीय धर्मादाय कार्यालयात तीन सहाय्यक आयुक्तांसह, एक उपायुक्त व एक विभागीय सह आयुक्त अशी अधिकारी संख्या झाली आहे.nnपब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन तर्फे चव्हाण यांचा स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्ष ॲड. शिवराज कदम जहागिरदार यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच कामकाज सुरळीत होण्यासाठी वकिलांचे सहकार्य राहील असे अश्वासित केले. येथील वकील कक्षात आयोजित कार्यक्रमात प्रशांत चव्हाण यांनी धर्मादाय आस्थापने मधील त्यांचे पूर्वानुभव व विश्वस्त कायद्याविषयी संकल्पना याविषयी मनोगत व्यक्त केले. पुण्यात येण्यापूर्वी यवतमाळ येथे सहाय्यक आयुक्त म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला आहे.nसह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की स्वत: सह सर्व अधिकारी सकाळी अकरा वाजता न्यायदान कक्षात उपस्थित पाहून सर्व प्रलंबित कामकाज त्वरेने निकाली काढण्याबाबत प्रयत्नशील असतील. त्यासाठी वकिलांचे सहकार्य खूप महत्वाचे आहे.nकार्यक्रमास उपायुक्त राहूल मामू, सहाय्यक आयुक्त अमरदीप तिडके व राहूल चव्हाण उपस्थित होते. ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. दिलीप हांडे, ॲड. पराग एरंडे, ॲड. मनोज वाडेकर, ॲड. डॅा. सागर थावरे, ॲड. ओजस देवळणकरॲड. मुकुंद आगलावे यांचेसह कार्यकारिणी सदस्य व वकील सभासद उपस्थित होते. खजिनदार ॲड. रजनी उकरंडे यांनी सूत्रसंचलन केले तर सचिव ॲड. सुनिल मोरे यांनी आभारप्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *