Fri. Apr 24th, 2026

इंदापूरला शेतकऱ्यांच्या बांधांवर पाणी आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – प्रभाकर देशमुख

Spread the love

इंदापूरला शेतकऱ्यांच्या बांधांवर पाणी आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – प्रभाकर देशमुख

संतोष भोसले ( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

लवादाने ३५ वर्षापूर्वी इंदापूर तालुक्यातील बावीस गावाला मंजूर केलेले हक्काचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधावर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे वक्तव्य महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी केले.
आज दि. २० रोजी इंदापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे रामभाऊ शिरगिरे,विकास जाधव,विठ्ठल म्हस्के, भगवान गायकवाड,कुमार गोडसे,गणेश डोंगरे,श्रीमंत शिंदे, पप्पू कदम,आबा घोडके, विष्णू देशमुख आदी पदाधिकारी, शेतकरी बांधव उपस्थित होते.
प्रभाकर देशमुख पुढे म्हणाले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेनुसारच आम्ही आंदोलन करत आहोत. इंदापूर तालुक्यातील बावीस गावातील शेतकऱ्यांवर पाण्याच्या बाबतीत गेली ३५ वर्षापासून अन्याय होत आहे. त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी लोकशाही मार्गाने लढा सुरु केला असून बावीस गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी आणल्याशिवाय हा लढा असाच सुरु ठेवणार असल्याचे ते म्हणाले.
उजनीचे पाच टीएमसी पाणी इंदापूरला देण्याला आमचा मुळीच विरोध नाही असे स्पष्ट करत लवाद समितीने यापूर्वी उजनीच्या १२३ टिएमसी पाण्याचे वाटप केले आहे. एक थेंबही पाणी देण्याकरिता शिल्लक नसताना बेकायदेशीर पणे पाच टीएमसी पाणी कसे दिले ? असा प्रश्न देशमुख यांनी उपस्थित केला.
देशाचे नेते शरद पवार हे अनेक वर्षापासून या बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. आता त्यांची कन्या सुप्रिया सुळे ह्या आता या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. गेली ३५ ते ४० वर्षे राज्यात सत्ता असतानाही येथील बावीस गावातील शेतकऱ्यांच्या घशाला कोरड का? शेतकरी आजही हक्काच्या पाण्यापासून अद्यापही वंचित का? असा सवाल त्यांनी विचारला.
शेतकऱ्यांची मुले मोठी झाली आहेत. मात्र त्यांच्या शेतीला पाणी मिळत नसल्याने त्यांना शहरात जाऊन नोकरी करावी लागत आहे. देशाचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बावीस गावच्या शेतकऱ्यांची मते घेऊन ते मंत्री बनले. मात्र त्यांना शेतक-यांच्या पाणी प्रश्नाचे काही देणेघेणे नसल्याचा आरोप प्रभाकर देशमुख यांनी यावेळी केला.
सिंचन अधिकारी यांनी आम्ही दिलेल्या पत्राची दखल घेतली नसल्याचे सांगून येत्या १५ दिवसांमध्ये दखल घ्यावी. अन्यथा पुणे येथे तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा प्रभाकर देशमुख यांनी यावेळी दिला.

Related Post

error: Content is protected !!