Thu. Apr 23rd, 2026

कौटुंबिक वादात पुरुषांचीही होरपळ, कोरोनाकाळात किरकोळ वादांत वाढ; केवळ पत्नीविरोधात दीड हजार तक्रारी…….

Spread the love

कौटुंबिक वादात पुरुषांचीही होरपळ,
कोरोनाकाळात किरकोळ वादांत वाढ;
केवळ पत्नीविरोधात दीड हजार तक्रारी…….

पुणे : कोरोनाच्या संसर्गात अनेक जण घरातून काम करत आहेत.
घरांमध्ये किरकोळ कारणावरून झालेले वाद विकोपाला जात असून कौटुंबिक कलहाची झळ पुरुषांनाही बसत आहे.
पत्नीकडून पतीला मारहाण, मानसिक आणि शारीरिक छळाचे प्रकार वाढत असून केवळ पुण्यात गेल्या दीड वर्षात एक हजार ५३५ पुरुषांनी पोलिसात तक्रारी केल्या आहेत.
पुणे पोलिसांच्या ‘भरोसा कक्षा’कडे दाखल झालेल्या तक्रार अर्जातून ही बाब समोर आली.
कोरोनाकाळापासून कौटुंबिक कलहातून एकूण तीन हजार तक्रारी दाखल झाल्या.
त्यात महिलांच्या आपल्या पतीविरोधातील तक्रारींची संख्या एक हजार ५४० इतकी आहे.
म्हणजेच पुरुषांनाही महिलांइतकेच छळाला सामोरे जावे लागत असल्याचे समोर आले.
या तक्रार अर्जांपैकी दोन हजार ३९४ अर्ज निकाली काढण्यात आले.
तसेच दाम्पत्यातील वाद सामोपचाराने मिटवण्यात आले आहेत.
कोरोनाच्या संसर्गात दाम्पत्यांमधील वाद वाढीस लागले आहेत.
पुणे पोलिसांच्या भरोसा कक्षाकडून समुपदेशन करण्यात येते.
तसेच एखाद्या प्रकरणात पोलीस ठाण्यांचीही मदत घेण्यात येत आहे.

* कारणे काय ?

कोरोना संसर्गकाळात घरातून काम करण्याच्या निमित्ताने पती आणि पत्नी या दोघांचा सहवास अधिक वाढला असला,
तरी दाम्पत्यांमध्ये फुटकळ गोष्टींवरून वाद आणि भांडणेही सर्वाधिक होऊ लागली आहेत.
या वादांचा परिणाम दोघांकडून एकमेकांचा छळ करण्यात झाल्याचे समोर आले.
या दीड वर्षातच पुरुषांकडून आपल्या पत्नीविरोधात तक्रारीचे प्रमाण वाढले आहे.

* आकड्यांच्या भाषेत..

गेल्या वर्षी पुणे पोलिसांच्या भरोसा कक्षाकडे एक हजार २८३ पुरुषांनी कौटुंबिक कलहाच्या तक्रारी दिल्या होत्या.
महिलांकडून ७९१ तक्रार अर्ज दाखल करण्यात आले होते.

Related Post

error: Content is protected !!