Fri. May 1st, 2026

मुंबईसह कोकण किनारपट्टीत रेड अलर्ट जारी…..

Spread the love

मुंबईसह कोकण किनारपट्टीत रेड अलर्ट जारी…..

मुंबईत दाखल झालेला मान्सून आपलं रौद्ररुप दाखवत असतानाच आता मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुढचे चार दिवस मुंबईत धुवांधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे.
मुंबईसह कोकण किनारपट्टीतही येत्या चार दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मान्सूनचं आगमन झालेलं आहे.
अनेक ठिकाणी सध्या जोरदार पाऊस पडत आहे.
कोकण किनारपट्टीला आज काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे.
मुंबईत पुढच्या चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुढचे चारही दिवस या सगळ्या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Related Post

error: Content is protected !!