एम एच टी सी ई टी 2021 चे प्रवेश नोंदणीचे वेळापत्रक जाहीर!
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष विभागाचा निर्णय…
सचिन तरंगे (शिव-कल्याण न्यूज नेटवर्क)
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष ,मुंबई यांच्यामार्फत शिक्षण वर्ष 2021-2022मध्ये अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषनिर्माणशास्त्र,आणि कृषी शिक्षण या व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी
“एम एच टी सी ई टी 2021″महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रावर आयोजित करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
प्रवेश परीक्षा नोदणी करीता स्वतंत्र वेळापत्रक जाहीर केले आहे, संकेत स्थळावर ऑनलाईन अर्जाची नोदणी आणि निश्चिती करणे या करीता 8जून2021ते7 जुलै 2021 पर्यंत चा कालावधी तर विलंब शुल्क सह ऑनलाईन अर्जाची नोदणी आणि निश्चिती करणे या करीता 8 जुलै 2021ते15 जुलै 2021पर्यंत चा कालावधी देण्यात आला आहे.
इयत्ता बारावीच्या पात्र विद्यार्थ्यांनी नोदणी www.mahacet.org या संकेस्थळावर नोदणी करावी असे आवाहन राज्याचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा विभागाचे आयुक्त चिंतामण जोशी यांनी केले आहे.
