Fri. May 1st, 2026

रेडणी गावच्या ओढ्यावरील पुल बांधकामाला वीस लाखाचा निधी!

Spread the love

रेडणी गावच्या ओढ्यावरील पुल बांधकामाला वीस लाखाचा निधी!
जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले यांच्याकडून ग्रामस्थांची मागणी पूर्णत्वाकडे……..
सचिन तरंगे (शिव-कल्याण न्यूज नेटवर्क)

मौजे रेडणी(तालुका इंदापूर)
येथील रेडणी – चाकाटी या रस्त्यावर ,व ओढ्या वरील पुल बांधकामाला जिल्हा परिषद निधीतून रक्कम रुपये 20लाख मंजूर करण्यात आले आहे.

बी के बी एन या राज्य मार्ग 120 च्या मार्गाला जोडणारा चाकाटी रेडणी हा रस्ता आहे.रेडणी गावच्या हद्दीत हा रस्ता ओढ्यातून जातो,पावसाळ्यात या रस्त्यावरील पूर्ण वाहतूक बंद राहते.त्यामुळे या गावातील नागरिक व शेतकरी यांचा गावाचा व राज्यमार्ग चा संपर्क तुटला जातो,

गेल्या अनेक वर्षांपासून या ओढ्यावर पुल बांधून रस्ता वाहतुकीसाठी खुला व्हावा,अशी मागणी या परिसरातील नागरिक व शेतकरी यांची मागणी होती.

या मागणीला साद घालत काटी
वडापुरी जिल्हा परिषद गटाचे विद्यमान सदस्य अभिजित तांबिले यांनी या ओढ्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी “जि प निधी”अंतर्गत येणाऱ्या निधीतून रक्कम रुपये 20 लाख इतकी तरतूद केली आहे.

रेडणी गावच्या हद्दीतील या ओढ्यावर कायमस्वरूपी पुल बांधकामाला सुरुवात होणार असल्याने या पुलाचे बांधकाम चे नियोजन व उपाययोजना व त्या संदर्भातील पाहणी करण्यासाठी बांधकाम विभागाचे अधिकारी रेडणी त पाहणी करण्यासाठी आले होते.

या वेळी जागेची पाहणी करण्यासाठी बांधकाम विभागाचे श्री तमसुरे,रेडणी ग्रामपंचायत विद्यमान माजी उपसपंच सुभाष पाटील, ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच प्रकाश शेंडगे,विद्यमान सदस्य प्रफुल्ल चव्हाण,सचिन तरंगे,रेडणी गावचे युवा नेते अमरदिप काळकुटे शहाजी तरंगे उपस्थित होते.

Related Post

error: Content is protected !!