बी के बी एन रस्त्याचे भूसंपादन, मात्र शेतकरी मोबदल्या पासून वंचित!

राजकीय नेते व शासकीय अधिकारी यांच्या मार्फत शेतकऱ्यांना साम दंडा ची भीती कंत्राटदार खत्री याच्यावर शेतकऱ्यांचा आरोप!
सचिन तरंगे(शिव-कल्याण
न्यूज नेटवर्क)
बारामती कुरवली नरसिंहपूर रस्त्यासाठी संपादित जमिनीचा मोबदला 1986पासून मिळाला नसल्याची तक्रार,तशा प्रकारचे निवेदन या भागातील शेतकऱ्यांनी पुणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अधिकारी तथा सक्षम प्राधिकारी यांना दिले आहे.
बारामती कुरवली नरसिंहपूर या राज्य मार्ग 120 या रस्त्याचे भूसंपादन न करता या रस्त्याचे काम चालू केले आहे,या भूसंपादनाचा अगोदर आर्थिक मोबदला द्या,अन्यथा शेतकरी काम करू देणार नसल्याचा इशारा ही त्यांनी दिला आहे.
या भागातील शेतकऱ्यां च्या सात बारा उताऱ्यावर तसेच फेरफार वर राज्य मार्ग 120ची नोद दिसून येत नाही,सदर चा रस्ता हा शेतकऱ्यांच्या मालकीच्या हद्दीतून जात आहे,आणि अश्यातच रस्त्यापासून 15फूट अंतरावर शेतकऱ्यांच्या हद्दीत शेत मालकाची परवानगी न घेता पिवळे सिमेंट चे खांब रोवण्यात आले आहेत,या बाबत ची लेखी तक्रार बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व इंदापूरचे तहसि लदार यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली आहे.
कंत्राटदार खत्री यांच्यावर आरोप:-
सदर या रस्त्याचे काम खत्री नावाच्या ठेकेदाराने घेतले असल्याची माहिती समोर येत आहे.सरकारी अधिकारी व राजकीय नेत्याचा दुरपयोग करून आम्हा शेतकऱ्यांना साम दाम दंड भेदकरून भीती कंत्राटदार खत्री दाखवीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन:-
सर्व शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून न्याय मिळावा,शेतकऱ्यांच्या मुळा वर उठणारे जी आर,अध्यादेश रद्द करून शेतकरी हिताचे कायदे करावेत,कोणत्याही शेतकऱ्याला आंदोलन,सत्याग्रह करण्याची वेळ येऊ देऊ नये,अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.
