Fri. May 1st, 2026

दहावीच्या परीक्षा बाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष

Spread the love

दहावीच्या परीक्षा बाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष

श्रीकृष्ण सातव फलटण तालुका प्रतिनिधी )

राज्य परीक्षा मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात आज तीन जून रोजी मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर सरकारच्या या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. तसेच सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेबाबत आज (3 जून) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. केंद्र सरकारने 12 वी ची परीक्षा आधीच रद्द केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्ट गेल्या आठवड्यात शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भात आपले प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयात दाखल केले. दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन नववी आणि दहावीच्या अंतर्गत गुणांच्या आधारे केले जाईल आणि अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षेचा पर्याय राज्य सरकारने विद्यार्थ्यांना दिला आहे.
कोरोना विषाणूच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगत राज्य सरकारने 1 जून रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान आपली बाजू न्यायालयासमोर मांडली. त्यानंतर आज मुंबई उच्च न्यायालय यासंदर्भात आपला अंतिम निकाल देण्याची शक्यता आहे. शिवाय, राज्य सरकार बारावीच्या परीक्षां संदर्भातही आपला भूमिका मुंबई उच्च न्यायालयाला सांगेल. केंद्र सरकारने केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाच्या (सीबीएसई) बारावीची परीक्षा रद्द केल्यानंतर आता एचएससी बोर्डाची परीक्षा सुद्धा रद्द होणार असल्याचे संकेत यापूर्वीच शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत.

Related Post

error: Content is protected !!