Fri. May 1st, 2026

शिव-स्वराज्य दिन साजरा करण्याचे राज्य सरकारचे निर्देश 6 जून हा दिवस साजरा करण्याचे आदेश

Spread the love

शिव-स्वराज्य दिन साजरा करण्याचे राज्य सरकारचे निर्देश

6 जून हा दिवस साजरा करण्याचे आदेश

सचिन तरंगे (शिव-कल्याण न्यूज नेटवर्क)

संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्व ग्रामपंचायती,पंचायत समित्या व जिल्हापरिषदांच्या कार्यालयामध्ये 6 जून हा दिवस “शिव-स्वराज्य दिन” म्हणून साजरा करण्याचे निर्देश महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने काढले आहेत.

या कार्यालयामध्ये शासनाच्या निर्देशानुसार शिव-स्वराज्य दिन कसा साजरा करावा, याची सहीता,नियमावली शासनाचे उपसचिव प. ख.जाधव यांनी स्वतंत्र परिपत्रकाद्वारे काढली आहे.

या परिपत्रकात ध्वज हा उच्च प्रतीचे साटिन असलेली भगवी जरी पताका असावी.ध्वज हा तीन फूट रुंद आणि सहा फूट लांब या प्रमाणात असावा.ध्वज हा जिरेटोप,सुवर्णहोन,जगदंब तलवार,शिवमुद्रा,वाघनखे ह्या शिवरायांच्या पंच शुभचिन्हणी अलंकृत असावा.अशा प्रकारे भगवा स्वराज्य ध्वज संहिता असावी असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

शिवाशक राजदंडाचे प्रतीक म्हणून कमीत कमी पंधरा फूट उंचीचा वासा,किंवा बांबू असावा.त्याच्यावर सुवर्ण किंवा लाल रंगाची गुंडाळी असावी.राजदंड सरळ उभा करण्यासाठी त्याला किमान पाच ते सहा फूटाचा आधार असावा,असे शिवशक राजदंड सहितेत स्पष्ट केले आहे.

येत्या सहा जून रोजी शिव-स्वराज्य दिन साजरा करताना तो सकाळी नऊ वाजता साजरा करण्यात यावा.स्वराज्य गुढी सरळ उभी करून राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने सांगता करावी. शिवसक राजदंड स्वराज्य गुढी सूर्यास्ताला खाली घ्यावी,
सदरच्या आदेशाचे पालन व्हावे,असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले असून याबाबत आदेश 1 जून 2021 रोजी काढण्यात आले आहेत.

Related Post

error: Content is protected !!