Fri. May 1st, 2026

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन च्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी भगवान मोरे

Spread the love

*आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन च्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी भगवान मोरे सर यांची निवड*
सहसंपादक :-रामवर्मा आसबे

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष गणेशदादा वाघचौरे , जनसंपर्क अधिकारी समीर परब यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशानुसार महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामधील इंदापूर तालुक्यातील भगवान मोरे सर यांची ” *आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन* ” च्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.या नियुक्तीचे पत्र आणि आयडेंटिटी कार्ड संघटनेचे महाराष्ट्र डायरेक्ट नागनाथ धोत्रे यांच्या हस्ते देवुन त्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी M9 मराठी News च्या मुख्यसंपादक मोनाली मोरे, हालगीसम्राट विठ्ठल अण्णा मोरे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी भगवान मोरे म्हणाले की, संघटनेच्या ध्येयधोरणानुसार व कलमानुसार समाजामध्ये सामाजिक कार्य करुन संघटनेच्या माध्यमातून अन्नदान, गोरगरीबांना किटवाटप, वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन ही कामे लगेच सुरू करणार असुन अन्यायाविरुद्ध आवाज उठवला जाईल.भविष्यात संघटनेला कुठल्याही प्रकारचे गालबोट न लागता समाजहितासाठी आणि समाजसेवेसाठी प्रयत्न करणार असुन सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असुन त्यांनी माझ्यावरती टाकलेला विश्वास सार्थ ठरवुन सर्वसामान्यांना न्याय देऊ.

Related Post

error: Content is protected !!