कोळकी ग्रामपंचायतीची पहिली ऑनलाइन ग्रामसभा गणपूर्ती अभावी तहकूब
श्रीकृष्ण सातव ( फलटण तालुका प्रतिनिधी )
दि.31 मे रोजी आयोजित करण्यात आलेली कोळकी ग्रामपंचायतीची पहिलीच ऑनलाइन ग्रामसभा गणपूर्ती अभावी खूप झाल्याची माहिती ग्राम विकास अधिकारी आर व्ही ननवरे यांनी दिली आहे. तसेच नवीन सदस्य निवडून आल्यानंतर ही त्यांचीही पहिलीच ग्रामसभा होती.तर तहकूब झालेली ग्रामसभा दिनांक आठ जून 21 रोजी ऑनलाइन पद्धतीनेच आयोजित करण्यात आलेले आहे.
या ग्रामसभेसाठी ऑनलाइन जोडण्यासाठी प्रयत्न केला असता जोडणी / संपर्क न झाल्याने सभेत जॉईन होता आले नसल्याची तक्रार काही ग्रामस्थांनी केलेली आहे. तर ही ग्रामसभा गुगल मिटच्या माध्यमातून सर्वांनाच ओपन असल्याने ज्वाइन होण्याबाबत अडचण येण्याची काहीच शक्यता नाही. या सभेसाठी पासवर्ड अथवा संकेत क्रमांक देण्यात आलेला नव्हता. केवळ लिंक देण्यात आलेली होती. या ऑनलाइन ग्रामसभेची जाहीर सुचना ही ग्रामस्थांना देण्यात आलेली नव्हती. देण्यात आलेली सूचना ही अल्प कालावधीत देण्यात व्हाट्सअप च्या माध्यमातून देण्यात आलेली होती.त्यामुळे या ग्रामसभे बद्दल बऱ्याच जणांना माहिती असण्या बाबत साशंकता आहे.या ग्रामसभेसाठी गण पूर्ती संख्या 100 कि 40 याबद्दल माहिती नसल्याचे लक्षात येत आहे. दिनांक 8 जून रोजी आयोजित केलेल्या ग्रामसभेस गणपूर्तीची आवश्यकता असणार नाही असेही सांगण्यात येत आहे. त्याबद्दल लोकांना निश्चित कल्पना नाही. या ग्रामसभेसाठी दिलेल्या विषया च्या संदर्भातील प्रश्न /माहिती ऑनलाइन पद्धतीने कोणाकडे पाठवली पाहिजे आणि कधी पाठवले असता ग्राह्य धरले जाणार आहेत याचीही कल्पना ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना देणे आवश्यक असल्याचे जाणवते. कोळकी प्रमाणेच दुधेबावी येथील ग्रामसभा 31 मे रोजी आयोजित करण्यात आली होती. तीही गणपूर्ती अभावी तहकूब करण्यात आले असून 9 जून रोजी आयोजित करण्यात आली आहे.
