बोराटवाडीत कृषीदुतांचे तोंडल्याच्या शाखा अभिवृद्धी वर प्रात्यक्षिक

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
दि. १३/१२/२०२४ रोजी डॉ. शरदचंद्र पवार कृषि महाविद्यालय बारामती चे विद्यार्थी *ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम* अंतर्गत विविध उपक्रम राबवत आहेत, त्याचाच एक भाग म्हणून बोराटवाडी येथे तोंडल्याची शाखा अभिवृद्धी हे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते.
या प्रात्यक्षिकांतर्गत तोंडल्याच्या वेलांच्या शाखेपासून तोंडल्याची अभिवृद्धी कशी करावी या विषयावर चर्चा करण्यात आली. तोंडल्यामध्ये शाखा अभिवृद्धीमुळे वाचणारा खर्च व त्याची वाढणारी उगवणक्षमता याबद्दल माहिती देण्यात आली.
याप्रसंगी गावचे सरपंच श्री.दत्तू यशवंत सव्वाशे व शेतकरी श्री.नारायण फडतरे, श्री.रामचंद्र हेगडकर, श्री.ज्ञानदेव हेगडकर, श्री.श्रीमंत अवताडे, श्री.विष्णु शिंदे, श्री.देवराज घोडके, श्री.नाना सव्वाशे, श्री.सचिन हेगडकर, श्री.पोपट देवकर, श्री.हनुमंत बोराटे, श्री.अभिजीत जाधव व इतर शेतकरी उपस्थित होते.
घेतलेल्या प्रात्यक्षिकाबद्दल शेतकऱ्यांनी उत्सुकता दाखवली व तोंडल्याची शाखा अभिवृद्धी व त्याचे होणारे फायदे याबद्दल माहिती घेतली.
प्रात्यक्षिकाचे नियोजन कृषिदूत निर्भय शेंडगे, ओमकार झेंडे, संकेत झेंडे, मंगेश कामठे, मनोज लडकत, शंकरानंद स्वामी,गिरीश शितोळे, प्रणित नन्नावरे यांनी प्राचार्य प्रा. एस. पी. गायकवाड सर व जी. एस. शिंदे सर यांच्या मार्गदर्शनातंर्गत केले.
