Sat. Jun 6th, 2026

विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

Spread the love

विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव मा.श्री.विरसिंह भैय्यासाहेब रणसिंग यांच्या हस्ते विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांना संबोधित करत असताना विरसिंह रणसिंग यांनी भारताला 15 ऑगस्ट 1947 या दिवशी स्वातंत्र्य मिळाले हा भारतीयांच्या आयुष्यात सोनेरी दिवस होता. भारतीयांचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले असे मत व्यक्त केले. त्यानंतर त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

1947 मध्ये ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने 26 जानेवारी 1950 आपली राज्यघटना स्वीकारून एक लोकशाही प्रजासत्ताक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. भारतीय संविधान हे जगातील सर्वांत मोठे लिखित संविधान आहे आणि ते आपल्या लोकशाही अधिकारांचे संरक्षण करते. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला समानता, स्वातंत्र्य व न्यायाची वागणूक मिळते. जेव्हा आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडू आणि समाजाप्रति असलेल्या आपल्या जबाबदाऱ्या पार पाडू तेव्हाच आपण एक मजबूत आणि समृद्ध देश घडवू शकतो हे आपण समजून घेतले पाहिजे. शिक्षण, मेहनत आणि एकजुटीने आपण आपल्या देशाला जगात एक मजबूत स्थान मिळवून देऊ शकतो. विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्त्व पटवून सांगितले. या प्रसंगी संस्था विश्वस्त मा.श्री.शंकरराव रणसिंग,प्राचार्य डॉ विजय केसकर,उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग,क्रिडा संचालक प्रा.डॉ सुहास भैरट,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी राजेंद्रकुमार डांगे इ मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते कला,क्रिडा,शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी यांचा सन्मान करण्यात आला. प्राचार्य डॉ.विजय केसकर यांनी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अभिजीत शिंगाडे व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.विद्या गुळीग यांनी व्यक्त केले.

Related Post

error: Content is protected !!