Sat. Jun 6th, 2026

बोराटवाडीत कृषीदुतांचे पेरू छाटणीवर प्रात्यक्षिक

Spread the love

बोराटवाडीत कृषीदुतांचे पेरू छाटणीवर प्रात्यक्षिक

( शिव-कल्याणन्युजनेटवर्क ) दि. ०२/०१/२०२५

डॉ शरदचंद्र पवार कृषि महाविद्यालय बारामती चे विद्यार्थी RAWE उपक्रमा अंतर्गत विविध कार्यक्रम राबवत आहेत, त्याचाच एक भाग म्हणून बोराटवाडी येथे पेरू छाटणीचे प्रात्यक्षिक हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

या प्रात्यक्षिकांतर्गत पेरू छाटणी व त्यानंतर घ्यावयाची काळजी या विषयावर चर्चा करण्यात आली. पेरू छाटणी चे महत्व व त्यामुळे उत्पादनात पडणारी भर याची माहिती देण्यात आली. याप्रसंगी शेतकरी श्री संजय फडतरे, श्री.महावीर मोरे, श्री.फारुख पठाण, श्री.प्रशांत खरात, श्री.आतिश सकट, श्री.संतोष सर्वगोड, श्री.गणेश मांडेकर, श्री.सोमनाथ तुपे, श्री.अमोल भोसले, श्री.तानाजी तुपे व इतर शेतकरी उपस्थित होते.
घेतलेल्या प्रात्यक्षिकाबद्दल शेतकऱ्यांनी उत्सुकता दाखवली व पेरू छाटणी व त्याचे होणारे फायदे याबद्दल माहिती घेतली.

प्रात्यक्षिकाचे नियोजन कृषिदूत निर्भय शेंडगे,ओमकार झेंडे, संकेत झेंडे, मंगेश कामठे, मनोज लडकत, गिरीश शितोळे, प्रणित नन्नावरे, शंकरानंद स्वामी यांनी प्राचार्य प्रा. एस. पी. गायकवाड सर व जी. एस. शिंदे सर यांच्या मार्गदर्शनातंर्गत केले.

Related Post

error: Content is protected !!