Thu. Apr 16th, 2026

सार्वजनिक निधी संकलनासाठी धर्मादाय कार्यालयाची परवानगी आवश्यक

Spread the love

सार्वजनिक निधी संकलनासाठी धर्मादाय कार्यालयाची परवानगी आवश्यक

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

येणाऱ्या काळात गणेशोत्सव व पाठोपाठ नवरात्रोत्सव सार्वजनिकरित्या मोठ्या प्रमाणावर साजरे होतात. त्यापैकी अनेक मंडळे ही धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असतात. परंतु बऱ्याच प्रसंगी नोंदणी नसलेल्या व्यक्तींद्वारे लोकांकडून वर्गणी गोळा केली जाते व असे पैसे गोळा करताना धर्मादाय आयुक्तांची पूर्व परवानगी घेतली जात नाही.

महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० च्या कलम ‘४१ क’ अन्वये कोणत्याही धार्मिक अथवा धर्मादाय प्रयोजनार्थ सार्वजनिकरित्या पैसे, वर्गणी, देणगी अथवा इतर वस्तू गोळा केल्या जात असतील तर त्याची माहिती धर्मादाय आयुक्तांना देणे बंधनकारक आहे. अशाप्रकारचा अर्ज करताना त्यामध्ये सार्वजनिक निधी संकलित करणाऱ्या व्यक्तींचे नाव, पत्ते, कार्यक्रमाची रूपरेषा, कालावधी व अपेक्षित वर्गणी याची माहिती द्यावी लागते. असा अर्जा आल्यावर त्याची पडताळणी करून पैसे गोळा करण्यास परवानगी दिली जाते.

सर्वात महत्वाचे म्हणजे किती निधी जमा झाला व त्याचा विनियोग कशाप्रकारे करण्यात आला याचे हिशोब कार्यक्रम संपल्यावर विहीत मुदतीत धर्मादाय आयुक्त कार्यालयात देण्याची जबाबदारी अर्जदारावर असते. नोंदणीकृत मंडळांना स्वतंत्र परवानगीची आवश्यकता नसली तरी त्यांच्या वार्षिक विवरणपत्रात याची नोंद घ्यावी लागते.
————————————-
सार्वजनिक पैशांच्या दुरुपयोग होऊ नये याची जबाबदारी निश्चित करण्यासाठी कायद्यामध्ये ही तरतूद करण्यात आली आहे. परवानगी प्रक्रिया सोपी असून कायद्याचे पालन सर्वांनी करावे.
*ॲड. शिवराज कदम जहागिरदार*
माजी अध्यक्ष, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, पुणे

Related Post

error: Content is protected !!