Thu. Apr 16th, 2026

पत्रकारांच्या प्रश्नांबाबत सरकारने पाऊले उचलावीत – शरद पवार

Spread the love

पत्रकारांच्या प्रश्नांबाबत सरकारने पाऊले उचलावीत – शरद पवार

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या माध्यमातून, आयोजित केलेली पत्रकार संवाद यात्रा राज्यभरातील, हजारो पत्रकारांच्या उपस्थितीत ( दि. 17 ऑगस्ट 2024) रोजी बारामती येथे पोहोचणार आहे.

या संवाद यात्रेला संबोधित करावे यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाध्यक्ष शरद पवार साहेब यांची दिल्ली ६ जनपथ येथील निवासस्थानी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष नीलकंठ मोहीते, सरचिटणीस सागर शिंदे यांनी विशेष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

राज्यातील पत्रकारांच्या मागण्या संदर्भात राज्य सरकार, केंद्र सरकारने पावले उचलवीत यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन शरद पवार यांनी दिले.

यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे पुणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष नीलकंठ मोहिते, ग्रामीण सरचिटणीस सागर शिंदे उपस्थित होते.

Related Post

error: Content is protected !!