Fri. Apr 24th, 2026

बारामती लोकसभा मतदार संघातून “अजित पवार “यांचा उमेदवारी अर्ज!

Spread the love

बारामती लोकसभा मतदार संघातून “अजित पवार “यांचा उमेदवारीअर्ज!

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि भाजपच्या मोदी -शहा -फडणवीस यांच्या प्रतिष्ठेच्या हा बारामती लोकसभा मतदार संघ आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून
अजित पवार आणि भाजपकडून खबरदारी घेण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे भाजप व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज काही कारणांनी छाननीमध्ये रद्द झाल्यास उमेदवारीबाबत प्रश्न उभा राहू नये म्हणून पर्यायी उमेदवार म्हणून अजित पवार यांचाही उमेदवारी अर्ज भरला जाण्याची शक्यता आहे.

त्यामुळे अजित पवार हे बारामतीचे ‘डमी’ उमेदवार असणार आहेत, हे नक्की.

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.

सुनेत्रा पवार या १८ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून उमेदवारी अर्ज घेण्यात आले आहेत.

त्यामध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावाने उमेदवारी अर्ज घेण्याबरोबरच अजित पवार यांच्याही नावाने अर्ज घेण्यात आले असल्याचे या मतदार संघांसाठी विधानभवन येथील विभागीय आयुक्त कार्यालयात तून सांगण्यात आले. या ठिकाणी या बारामती लोकसभा मतदार संघांसाठी निवडणूक कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीच्या उमेदवारांकडून खबरदारी घेतली जात आहे. या छाननीमध्ये अर्ज बाद होऊ नये, यासाठी उमेदवारांकडून अर्जाची बारकाईने तपासणीही केली जात आहे.

तरीही उमेदवारी अर्ज काही कारणांमुळे रद्द झाल्यास महायुतीने आपला पर्यायी उमेदवार म्हणून त्यानुसार बारामती लोकसभा मतदारसंघातून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांचा अर्ज दाखल करणार आहे.

मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात 12 एप्रिल पासून झाली असून अंतिम मुदत १९ एप्रिल आहे. त्यामुळे १८ एप्रिल रोजी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून अर्ज दाखल केले जाणार आहेत.

महायुती ने पर्यायी उमेदवार म्हणून अजित पवार यांच्या नावाने अर्ज घेण्यात आला आहे. त्यांनी अर्ज दाखल केल्यास ते बारामतीतील पर्यायी उमेदवार असणार आहेत, हे नक्की.

बारामती मतदारसंघाची निवडणूक ही अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केली आहे. महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे या निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा दगफटका होऊ नये, यासाठी अजित पवार यांच्याकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

बारामती लोकसभा मतदार संघांसाठी सोमवारी 4 अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तसेच 15 उमेदवारांनी अर्ज नेले आहेत.

सुप्रिया सुळे 18 एप्रिल ला भरणार अर्ज –

महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरद चंद्र पवार या पक्षा कडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Related Post

error: Content is protected !!