Fri. Apr 24th, 2026

इंदापूर तालुक्यातील मलिदा गँग वर आमदार रोहित पवार काय बोलणार!

Spread the love

इंदापूर तालुक्यातील मलिदा गँग वर आमदार रोहित पवार काय बोलणार!

सुप्रिया सुळे च्या प्रचारार्थ काटी येथे सभा.

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

बारामती लोकसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरदचंद्र पवार पक्ष्याच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आमदार रोहित पवार यांची सभाशुक्रवार दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता होणार आहे.

या बाबत ची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरदचंद्र पवार पक्ष्याचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख अमोल मुळे यांनी दिली.

कर्जत -जामखेड चे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरदचंद्र पवार पक्ष्याचे स्टार प्रचारक रोहित पवार हे या सभेत इंदापूर तालुक्यातील मलिदा गँग वर आमदार रोहित पवार काय बोलणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

इंदापूर तालुक्यातील काटी – वडापुरी जिल्हा परिषद मतदार संघात ही सभा होत असल्यामुळे या सभेला ‘राजकीय महत्व ‘प्राप्त झाले आहे.

राज्यात आमदार रोहित पवार यांच्या राजकीय सभेस तरुण युवक व मतदार यांची गर्दी असते.

बारामती लोकसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरदचंद्र पवार पक्ष्याच्या उमेदवार सुप्रिया सुळे या ‘तुतारी ‘या चिन्हावर निवडणूक लढवीत आहेत.

या सभेत उमेदवार सुप्रिया सुळेयांच्या उपस्थिती त आमदार रोहित पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून इंदापूरात राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.

Related Post

error: Content is protected !!