धनगर समाजाने लोकसभा निवडणुकीत “अस्तित्वाची “ताकत दाखवावी – डॉ. शशिकांत तरंगे यांचे आवाहन

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
देशात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. महाराष्ट्रात 48 जागेवर लोकसभा निवडणूक होत आहे. राज्यातील प्रादेशिक पक्ष आणि देशातील राष्ट्रीय पक्ष निवडणुकीत उतरले आहेत.महाराष्ट्रात दोन नंबरची लोकसंख्या धनगर समाजाची असताना राज्यात एकाही पक्षाने धनगर समाजाला लोकसभेची उमेदवारी दिली नाही.त्यामुळे धनगर समाजाच्या ‘अस्तित्वावर ‘येथे प्रश्न निर्माण झाला आहे. ही बाब समाजातील तरुणांनी लक्षात घेतली पाहिजे.
डॉ. शशिकांत तरंगे आज बाबीर गढावर आयोजित
“शोध अस्तित्वाचा!धनगराच्या भविष्याचा “या विषयावरील चर्चा सत्रातील विषयावर ते बोलत होते. या चर्चा सत्रास इंदापूर तालुक्यातील धनगर समाजाचे युवक उपस्थित होते.
यावेळी या चर्चा सत्रातील विषयावर बोलताना आणि युवकांना मार्गदर्शन करताना -डॉ. शशिकांत तरंगे म्हणाले की, धनगर समाजाचे अस्तिव असताना हा समाज अस्तित्वहीन झाला आहे.धनगर समाजाचा आरक्षणाचा गेल्या 75 वर्षांपासून प्रलंबित आहे, धनगर समाजासाठी योजना आहेत परंतू एकाही योजनेला पैसा सरकार ने उपलब्ध करून दिला नाही, पुणे शहरांत धनगर समाजाच्या मुला -मुलींसाठी सरकारने समाजाची मते घेऊनही एकही हॉस्टेल सुरु केले नाही. धनगर समाजाच्या मुलांची स्कॉलरशिप मिळत नाही, सरकार निधीची घोषणा करते परंतू प्रत्यक्षात निधी उपलब्ध करून देत नाही. मग या प्रस्तापित उमेदवारांस मतदान का करायचे असा सवाल डॉ. शशिकांत तरंगे यांनी केला.
मतदान का करायचे,यावर चर्चा करण्यासाठी गुरुवारी दिनांक 21 मार्च 2024 रोजी बाबीर गढावर ‘धनगर समाजाच्या ‘मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती डॉ. शशिकांत तरंगे यांनी दिली.
