Fri. Apr 24th, 2026

राष्ट्रवादी पार्टीच्या युवती इंदापूर तालुका उपाध्यक्ष पदी “कल्याणी शहाजीराजे भोसले”

Spread the love

राष्ट्रवादी पार्टीच्या युवती इंदापूर तालुका उपाध्यक्ष पदी “कल्याणी शहाजीराजे भोसले”

आमदार दत्तात्रय भरणे ( मामा ) च्या हस्ते नियुक्ती पत्र

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या युवती इंदापूर तालुका उपाध्यक्ष पदी कल्याणी शहाजीराजे भोसले यांची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कळंब ( ता.इंदापूर ) येथे विविध विकास कामांचा शुभारंभ इंदापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दत्तात्रय भरणे यांचे शुभहस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संप्पन्न झाला.

ग्रामपंचायत कार्यालया समोर उभारण्यात आलेल्या भव्य व दिव्य शामियान्यात भरणे मामांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी भरणे मामांची हत्ती वरून दिमाखात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी दादासाहेब हनुमंत डोंबाळे, कल्याणी भोसले, हर्षवर्धन हारमोडे, अमेय बंडू चव्हाण व आदिंना नियुक्ती केल्याबद्दल चे निवडीचे पत्र आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी पं.स.चे मा. सदस्य सुहास डोंबाळे, मार्केट कमिटीचे मा.सभापती दत्तात्रय फडतरे,सरपंच विद्या अतुल सावंत, कळंब सोसायटीच्या चेअरमन योगिता शहा, योगेश डोंबाळे, संदिप पाटील, राजेंद्र ( पिंटू ) डोंबाळे, कालिदास राऊत सर, कळंब सोसायटीचे व्हा.चेअरमन संजय खरात, अभिजित खंडागळे, सुनिल सोलनकर, सर्जेराव जाधव,सागर कोळी, सोमनाथ घोडके, पांडूरंग घोडके आदी मान्यवर, ग्रामस्थ,महिला, पत्रकार व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Post

error: Content is protected !!