Thu. Apr 23rd, 2026

जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत म्हसोबाचीवाडी विद्यालयास प्रथम क्रमांक

Spread the love

जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत म्हसोबाचीवाडी विद्यालयास प्रथम क्रमांक

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी ता. इंदापूर येथील विद्यालयाचा हॉलीबॉल जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. जिल्हा क्रीडा अधिकारी ,क्रिडा संचालनालय पुणे व यांच्या विद्या प्रतिष्ठान बारामती यांच्या सयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत १७ वर्षाखालील वयोगटातील मुले व मुली यांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये १७ वर्षे वयोगटात माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी विद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले.माध्यमिक विद्यालय मसोबाचीवाडी हॉलीबॉल संघात तनवी लालासो साळुंके,प्रणाली बाळासो पवार ,स्नेहा राहुल जगताप, श्रावणी संतोष चांदगुडे ,साक्षी अभिजीत साळुंखे,समृद्धी चंद्रकांत चांदगुडे,वर्षा शिवाजी काळे या खेळाडू विद्यार्थीनी हॉलीबॉल संघात सहभाग घेतला.प्रशिक्षक किरण पवार, मुख्याध्यापक प्रमोद भोंग यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

संस्था सचिव विरसिंह रणसिंग यांनी संस्थेच्या माध्यमातून विद्यालयास भौतिक सुविधासह क्रिंडागण साहित्य व सुविधा उपलब्ध असल्यामुळे विद्यालयातील विद्यार्थी शिक्षणासह क्रिडा क्षेत्रात यशस्वी होत असल्याचे सांगितले.

विद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा आनंदी रणसिंग,उपाध्यक्ष प्रकाश कदम सचिव वीरसिंह रणसिंग, खजिनदार हणमंतराव रणसिंग, विश्वस्त कुलदीप हेगडे,वीरबाला पाटील,शिवाजी रणवरे यांनी अभिनंदन केले.

Related Post

error: Content is protected !!