इंदापूरात सुप्रियाताई सुळे कार्यकर्त्यांशी साधणार संवाद !

सोनाई पॅलेस येथे बैठकीचे आयोजन.
सचिन तरंगे ( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया ताई सुळे यां इंदापूर दौऱ्यावर 25 सप्टेंबर रोजी येत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या तालुका महिला अध्यक्षा छायाताई पडसळकर यांनी दिली.

इंदापूर विधानसभा मतदार संघात इंदापूर येथील ‘सोनाई पॅलेस ‘येथे सोमवारी दुपारी 3:30 वाजता कार्यकर्ता संवाद बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत सुप्रिया ताई कार्यकर्त्यांशी सवांद साधणार आहेत. कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या तालुका महिला अध्यक्षा छायाताई पडसळकर यांनी केले आहे.

25 सप्टेंबर रोजी होणाऱ्या इंदापूर दौऱ्यात खासदार सुप्रिया ताई सुळे दुपारी 2 वाजता भिगवण, तक्रारवाडी, मदनवाडी येथील गणेशउत्सव मंडळास भेटी देणार आहेत.

सायंकाळी 5 वाजता सरस्वती नगर येथील गणेशउत्सव मंडळास व इंदापूर शहरातील विविध गणपती मंडळाकडे आरती साठी उपस्थित राहणार आहेत.
तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन छायाताई पडसळकर यांनी केले आहे.
