कळंब पोलीस पाटील पदासाठी 14 उमेदवार पात्र तर 2 उमेदवार अपात्र!
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
कळंब, ता. इंदापूर येथील पोलीस पाटील पदाच्या भरती भरती प्रक्रिये मध्ये परीक्षेस पात्र उमेदवारांची यादी बारामती उपविभागीय अधिकारी तथा अध्यक्ष पोलीस पाटील निवड समिती यांनी प्रसिद्ध केली आहे.
उपविभाग बारामती – इंदापूर पोलीस पाटील भरती सन 2023 ची प्रक्रिया सुरु असून, यात एकूण 16 उमेदवारांनी सहभाग घेतला होता.
या विभागा मार्फत होणाऱ्या परीक्षेसाठी 14 उमेदवार पात्र ठरले. तर 2 उमेदवार अपात्र ठरले. 2 उमेदवारांचे वय 45 वर्षापेक्षा अधिक असल्यामुळे हे 2 उमेदवार अपात्र ठरले.
