Thu. Apr 23rd, 2026

भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा (दक्षिण) किसान मोर्चा अध्यक्षपदी तानाजी बापू थोरात यांची निवड

Spread the love

भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा (दक्षिण) किसान मोर्चा अध्यक्षपदी तानाजी बापू थोरात यांची निवड

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा दक्षिण जिल्हा कार्यकारिणी आज रोजी जाहीर झाली यामध्ये जिल्हा किसान मोर्चा अध्यक्षपदी तानाजीबापू थोरात यांची निवड झाली एका अत्यंत तळमळीच्या, शेतकऱ्यांप्रती निष्ठा असणाऱ्या व भारतीय जनता पार्टी मध्ये निष्ठावंत असणाऱ्या कार्यकर्त्यास संधी मिळाल्याने लोकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

तानाजी बापू थोरात यांनी भाजपामध्ये अनेक पदे भूषवली आहेत यापूर्वी भाजपा जिल्हा सरचिटणीस , जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस, इंदापूर तालुका अध्यक्ष अशा संघटनेमधल्या पदांवरती त्यांनी काम केले आहे छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदी व संजय गांधी निराधार योजनेच्या तालुकाध्यक्षपदी ही त्यांनी काम केले संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी काम करत असताना त्यांनी अनेक निराधार गोरगरीब लोकांना न्याय देण्याचे काम केले व सर्वाधिक प्रकरणे मंजूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदी निवड झाल्यावर त्या अगोदरही अनेक वर्षे त्यांनी सभासदांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी अनेक वेळा आवाज उठवला. या कामाची दखल घेत भारतीय जनता पार्टीने त्यांची पुन्हा एकदा किसान मोर्चा जिल्हाध्यक्षपदी निवड करून त्यांच्या कामाची पोच पावती दिली.

यावेळी त्यांनी  यापुढेही शेतकऱ्यांच्या हितासाठीचा लढा अजूनच जोमाने चालू ठेवणार असल्याचे सांगितले. व भारतीय जनता पार्टी चे जिल्हाध्यक्ष वासुदेवनाना काळे, मा. हर्षवर्धन पाटील साहेब , मा. चंद्रकांत दादा पाटील, व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे साहेबांचे आभार मानले .

Related Post

error: Content is protected !!