Thu. Apr 23rd, 2026

वालचंदनगर कंपनीच्या कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य –  हर्षवर्धन पाटील

Spread the love

वालचंदनगर कंपनीच्या कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य – हर्षवर्धन पाटील

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

वालचंदनगर कंपनीतील कामगारांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी वालचंद नगर पोलीस स्टेशनच्या शेजारी एक दिवसीय लक्षणीय उपोषण केले. वालचंदनगर कंपनीतील कामगारांचे थकीत देणे व इतर प्रश्न मार्गी लावण्यासाठी कंपनीचे मालक चिराग शेठ दोशी यांच्याशी यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवार दिनांक (15 ) रोजी लाक्षणिक उपोषण स्थळावरून सकारात्मक चर्चा केली. वालचंदनगर कंपनीतील आय.एम.डी कामगार समन्वय संघटनेने कामगारांची थकीत देणी मिळावीत या व इतर विविध मागण्यांसाठी मंगळवार दि.(15 ) रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषणास हर्षवर्धन पाटील यांनी भेट देऊन कामगारांशी संवाद साधला.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष कपिल गायकवाड, संजय नकाते, राहुल बावडेकर आदींनी कामगारांच्या मागण्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर मांडल्या. याप्रसंगी कंपनीतील कामगारांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी वालचंदनगर इंडस्ट्रीजचे मालक चिरागशेठ दोशी यांच्याशी हर्षवर्धन पाटील यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. सदरची चर्चा सकारात्मक झाली. वालचंदनगर कंपनीच्या कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य राहील, असे याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

Related Post

error: Content is protected !!