Thu. Apr 23rd, 2026

इंदापूर पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी केली जे्रबंद! सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांची माहिती

Spread the love

इंदापूर पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी केली जे्रबंद!सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांची माहिती

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीत 19 ऑगस्ट 2023 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास रात्र गस्त करीत असताना पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे यांना मौजे सराफवाडी -रेडा रोडवर दोन मोटार सायकल वरती पाच इसम संशयित रित्या फिरत असल्याची माहिती गुप्त हेरामार्फत मिळाली, त्यानंतर रात्रगस्त पोलीस अधिकारी सुधीर पाडुळे, बावडा दूरक्षेत्र पोलीस अंमलदार अमोल गायकवाड,व विनोद लोखंडे यांनी
एकमेकांशी संपर्कात राहून संशयित रित्या फिरत असलेल्या दोन मोटार सायकल साफळा रचून प्रयत्न केला असता मोटार सायकल वरील पाच इसम मोटार सायकल टाकून पळू लागले,त्यातील चार इसमांना पाठलाग करून ताब्यात घेतले.परंतू त्यातील एक इसम अंधाराचा फायदा घेऊन शेतामधून पसार झाला. वरील ताब्यात घेतलेल्या इसमाकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे 1नग स्क्रू ड्रायवर,1नग ऍडजेस्टबल पाना,1 नग लोखंडी कटावणी,प्लास्टिक च्या कॅरिबॅग मध्ये मिरची पावडर,मोटार सायकल नं MH 45 R 5016 तसेच MH 45 B 1516अशा दोन मोटार सायकली मिळून आल्या.

सदरची माहिती इंदापूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, बावडा पोलीस स्टेशन चे सहा. पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांना देण्यात आली.सदर पोलीस अधिकाऱ्यांनी रेडा गावच्या हद्दीत घटना स्थळी भेट दिली. सदर इसमांची सखोल चौकशी केली असता दरोडा घालण्याच्या पूर्व तयारीत असतानाचे आढळून आले. सहा.पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांना त्यांचेवरती अनेक गुन्हे असल्याचे दिसून आले.फरार आरोपी शिवा भिटू भोसले हा पिटकेश्वर चा असून याच्यावर नातेपुते पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि 60/2009 न्वे भा द वि क 439,395,384. गुन्हा रजि 54/2010भा द वि क 385,384 तसेच इंदापूर पोलीस स्टेशनं मध्ये गुन्हा रजि नं 328/2015 भा द वि क 395, गुन्हा रजि नं 50/2016 भा द वि क 395,397 गुन्हा रजि नं 55/2019 भा द वि क 324,506,143,147,148,149 तर दुसरा आरोपी टायटन शिवा भोसले राहणार पिटकेश्वर याच्यावर वालचंदनगर पोलीस स्टेशनं गुन्हा रजि नं 73/2023 भा द वि क 376,376ड,354,506 तर तिसरा आरोपी शामराव उर्फ जगताप काळुराम भोसले, पिटकेश्वर याच्यावर सांगोला पोलीस स्टेशनं गुन्हा रजि नं 459/2018भा द वि क 380,457,34, गुन्हा रजि नं 528/2019 भा द वि क 380,457,34गुन्हा रजि नं 719/2019 भा द वि क 380,457,34 तर चौथा आरोपी दिलीप सयाजी पवार, पिट केश्वर याच्या वर दौंड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजि नं 148/2013भा द वि क 380,457,34असे गुन्हे दाखल आहेत.

इंदापूर पोलीस स्टेशन अंकित बावडा दूर क्षेत्र हद्दीतील रात ग्रस्त पोलीस अंमलदार विनोद लोखंडे यांनी वरील पाच इसमविरुद्ध दरोडा घालण्याच्या पूर्व तयारीत असल्याने भा द वि क 399,402 प्रमाणे फिर्याद दिली आहे. गुन्ह्याचा तपास सहा पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील करीत आहेत. तसेच या कारवाई करतेवेळी पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहा पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे,सहा पोलीस फौजदार के. बी. शिंदे,चालक पोलीस हवालदार सुनील बालगूडे,महिला पोलीस हवालदार खंडागळे, माधुरी लडकत,
पोलीस नाईक अमोल गायकवाड,सुनील कदम, कळसाईत,
पोलिस शिपाई विनोद लोखंडे,अरिफ सय्यद, अकबर शेख,विशाल चौधर,सुधीर शेळके,दिनेश चोरमले यांनी मिळून केली.

Related Post

error: Content is protected !!