Fri. Apr 24th, 2026

प्रवीण मसाले वाले ट्रस्ट मार्फत “शासनमान्य सार्वजनिक वाचनालयांना “पुस्तकं संच भेट “

Spread the love

प्रवीण मसाले वाले ट्रस्ट मार्फत “शासनमान्य सार्वजनिक वाचनालयांना “पुस्तकं संच भेट “

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

इंदापूर, दि. 3 जुलै : पुणे येथील प्रवीण मसाले वाले ट्रस्ट मार्फत इंदापूर तालुक्यातील 77 शासनमान्य सार्वजनिक वाचनालयास एकूण 40 पुस्तकाचा संच गुरूपोर्णिमाचे औचित्य साधत भेट देण्यात आला.

या वेळी प्रवीण मसाले वाले ट्रस्ट चे समन्व्यक पोपट काळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

हा कार्यक्रम इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे तालुका वाचनालय इंदापूर येथे आयोजित केला होता.

या कार्यक्रमांस पुणे जिल्हा ग्रंथालय संघांचे कार्यवाह सोपान पवार, संचालक अंबादास कवळे, माजी संचालक राजेंद्र घोरपडे, रामभाऊ जामदार, तसेच संभाजी देवकर,शहाजीराजे भोसले, संतोष भोसले,सुरेश देवकर, अरुण क्षीरसागर, जयश्री वाकसे, देशपांडे मॅडम, इ मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रस्तविक व सूत्रसंचालन सचिन तरंगे यांनी तर आभार तालुका वाचनालयच्या ग्रंथपाल संध्या दंडवते यांनी मानले.

Related Post

error: Content is protected !!