खासदार सुप्रियाताई सुळे आणि आमदार दत्तात्रय भरणे यांची तरंगे परिवारास सांत्वन भेट !

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
खासदार सुप्रियाताई सुळे आणि आमदार दत्तात्रय भरणे यांनी आज रविवार दिनांक 25 जून 2023 रोजी कै विघ्नेश नानासो तरंगे ( वय 16)याचे दुःखद निधन झाल्यामुळे तरंगे परिवाराची सांत्वन पर भेट घेतली.
विघ्नेश नानासो तरंगे हा लाखेवाडी येथील जय भवानी गढ शिक्षण संस्थेत इ 10 वी शिकत होता.कुस्ती हा त्याचा आवडता खेळ होता.त्याचे वडील नानासो तरंगे याचे तो लहान असतानाच दुःखद निधन झाले, लहान पानापासून त्याची आई वर्षा हिने त्याचे पालन पोषण केले होते.
विघ्नेश च्या परिवाराच्या सुख दुःखात कायम सोबत राहू असे सुप्रिया ताई सुळे म्हणाल्या.
त्याच्या मागे त्याची आई, आजी, आजोबा, चुलता व चुलती असा परिवार आहे.
रेडणी ग्रामपंचायत चे माजी सदस्य सचिन तरंगे यांचा तो पुतण्या आहे.
आमदार दत्तात्रय भरणे यांनी ही सांत्वन केले.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे, माजी जि. प. सदस्य श्रीमंत ढोले,शुभम निंबाळकर,सचिन सपकळ, रेडणी ग्रामपंचायत सदस्य सचिन काळे, शहाजी तरंगे, अजित शेडगे, मोहन तरंगे, ज्ञानदेव पाटील, आनंद तरंगे,इत्यादी मान्यवर होते.
