पंतप्रधान मोदींच्या समोर अमेरिकेचे राष्ट्रगीत गाणार वालचंदनगरचे विठ्ठल व मंगल भोसले यांची नात आणि अमेरिकास्थित राहुल व श्रद्धा पवार यांची सोळा वर्षाची कन्या रिया

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
रिया राहुल पवार हि सोळा वर्षाची, भारतीय-अमेरिकन सुंदर आवाज असलेली मुलगी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर अमेरिकन राष्ट्रगीत सादर करणार आहे. 23 जून रोजी वॉशिंग्टन डि.सी. मधील रोनाल्ड रिगन बिल्डिंग मध्ये अनिवासीय आणि भारतीय वंशज ( इंडियन डायस्पोरा ) यांच्या कार्यक्रमादरम्यान किशोरवयीन गायकी रिया पवार गाणार आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी 21 ते 23 जून दरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. 22 जून रोजी मोदींसाठी राज्य भोजनाचे आयोजन केले आहे. या भेटीत 22 जून रोजी पंतप्रधान मोदी काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. ते 23 जून रोजी वॉशिंग्टन मधील रोनाल्ड रिगन बिल्डिंग आणि इंटरनॅशनल ट्रेड सेंटर येथे अनिवासीय आणि भारतीय वंशज ( इंडियन डायस्पोरो ) नेत्यांच्या निमंत्रित मेळाव्याला संबोधित करणार आहेत.

मूळचे वालचंदनगर व पुण्याचे असणारे रियाचे आई-वडील श्रध्दा व राहुल आणी भाऊ रिशान गेल्या अनेक वर्षांपासून न्यू जर्सीमध्ये रहातात. रिया हि विठ्ठल व मंगल भोसले यांची नात आहे. तिने दाखवून दिले आहे कि, लहान वयातही बर्याच गोष्टी साध्य करता येतात. तिने अनेक मोठ्या कार्यक्रमासाठी या आधीही अप्रतिम गायन केले आहे.
वालचंदनगर व इंदापूर तालुक्याच्या दृष्टिने सदर बाब अभिमानास्पद आहे.
