अवैधरित्या हातभट्टी दारू व देशी विदेशी दारू विक्रेत्यावरती कारवाई!
सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांची माहिती.
सचिन तरंगे ( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
इंदापूर पोलीस स्टेशन अंकित बावडा दूरक्षेत्र हद्दीमध्ये अवैधरित्या हातभट्टी दारू व देशी विदेशी दाअवैधरित्या हातभट्टी दारू व देशी विदेशी दारू विक्रेत्यावरती करण्यात आली.
हीं कारवाई करण्याकरीता इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री दिलीप पवार यांनी विशेष प्रोहिबिशन पथक तयार करून आज दिनांक १६एप्रिल २०२३ रोजी मौजे नीरा नरसिंगपूर व पिंपरी गावामध्ये अवैधरित्या बेकायदेशीर हातभट्टी दारू व देशी विदेशी दारू विक्री करणारे निरा नरसिंगपूर येथील ०५ इसमांच्या व
पिंपरी बुद्रुक येथील दोन इसमांच्या राहत्या घरी जाऊन अवैद्य हातभट्टी दारू व देशी विदेशी दारू वरती प्रोहिबिशन रेड केली. सदर कारवाई मध्ये एकूण ३०६५०/-मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अवैद्य हातभट्टी दारू बेकायदेशीररित्या विक्री करीत असल्याने यांच्यावरती महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्यवे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

दिनांक ०९एप्रिल २०२३ रोजी मौजे काटी येथे अवैध हातभट्टी दारू काढणारे ०१ इसमाच्या शेतामध्ये ओढाच्या काठाला असलेल्या अवैध्य हातभट्टी दारू वरती प्रोहिबिशन रेड करून सदरच्या प्रोहिबिशन रेड मध्ये एकूण 84000/-रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर इसमांवरती महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दिनांक ११एप्रिल २०२३ मौजा काटी व लाखेवाडी गावामध्ये अवैधरित्या बेकायदेशीर हातभट्टी दारू व देशी विदेशी दारू विक्री करणारे काटी येथील ०२ इसमांच्या व लाखेवाडी येथील ०१ इसमांच्या राहत्या घरी जाऊन अवैद्य हातभट्टी दारू व देशी विदेशी दारू वरती प्रोहिबिशन रेड केली. सदर कार्यामध्ये २६४५०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वरील इसमावरती महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्यवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच तीन कारवाई मध्ये एकूण १४११००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक माननीय श्री. अंकित गोयल साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती श्री. आनंद भोईटे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग श्री गणेश इंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, महिला पोलीस हवालदार लडकत, पोलीस नाईक कदम, गायकवाड, खान,पोलीस शिपाई सय्यद आरणे, मिरकले, राखुंडे यांनी मिळून केली.
