युवकांनी शिवाजी महाराजांचा इतिहास वाचावा व आदर्श घ्यावा – मा.राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज राजे शूरवीर होते, दानशूर, न्यायी होते.महान पराक्रमी राजेंची परंपरा आपल्याला लाभली असली तरी रयतेचा राजा अस म्हटलं की, समोर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसर कुठलं नाव येत नाही. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपतींनी रचला. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण उत्साहाने साजरी करतो यानिमित्त राजांच्या व्यक्तिमत्वाची अनमोल वैशिष्ट्ये जाणून घेतली पाहिजेत. ज्यामुळे रयतेचा राजा नव्या पिढीला समजेल. यासाठी युवकांनी शिवाजी महाराजांचा इतिहास वाचावा, व त्यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन मा.राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले. 
19 फेब्रुवारी रोजी इंदापूर तालुक्यातील विविध ठिकाणी शिवजंयती सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्यास आमदार दत्तात्रय भरणे यांनी भेटी देऊन छत्रपती शिवरायांना अभिवादन केले.
