Thu. Apr 23rd, 2026

विश्वासराव रणसिंग महाविद्यालयांमध्ये निर्भय कन्या अभियान कार्यशाळा संप्पन्न 

Spread the love

विश्वासराव रणसिंग महाविद्यालयांमध्ये निर्भय कन्या अभियान कार्यशाळा संप्पन्न

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब-वालचंदनगर येथे वार बुधवार दिनांक 22/02/2023 रोजी विद्यार्थी विकास मंडळ आयोजित निर्भय कन्या अभियाना अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या, अकलूज मा.सविताताई व्होरा,उपाध्यक्ष-इंदापूर तालुका ग्राम विकास प्रतिष्ठानचे मा.श्री प्रकाश बापू कदम व महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ.अंकुश रावजी आहेर सर व विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.राजेंद्रकुमार डांगे सर या सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन झाले. उपस्थित मान्यवरांचे गुलाबाचे रोप देऊन सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.राजेंद्रकुमार डांगे सर यांनी केले. प्रास्ताविकामध्ये निर्भय कन्या अभियानाचा उद्देश व निर्भय कन्या अभियान राबविण्यात मागची गरज का आहे. सर यांनी स्पष्ट केले की अभियानाच्या माध्यमातून मुलींमध्ये धैर्य व हिम्मत निर्माण करणे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे हे देशातील पहिले विद्यापीठ आहे की जे निर्णय कन्या अभियान राबवते गोष्टी सरांनी प्रास्ताविकांमध्ये स्पष्ट केल्या. नंतर प्रथम सत्राच्या प्रमुख व्याख्याता मा.सौ सविताताई व्होरा यांनी “स्वस्थ् कन्या स्वास्थ भारत” या विषयावरती मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थिनींना शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य कसे सदृढ करावे,तसेच मुलींनी आत्मनिर्भर कसे व्हावे,आयुष्यात येणाऱ्या संकटांना न घाबरता सामोरे कसे जावे, याचे मार्गदर्शन करताना त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील उदाहरणे देऊन स्पष्ट केले. त्याचबरोबर आई व मुलीचे संबंध कशाप्रकारे असावेत. मुलगी वयात आल्यावर आईने मुली बरोबर एक मैत्रिणीसारखे रहावे असे सर्व उपस्थित माता-पालक वर्गाला सांगितले. तसेच त्यांनी विद्यार्थिनींना सांगितले की विद्यार्थिनींनी आपल्या आई-वडिलांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण करावा. प्रथम सत्राचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अंकुशरावजी आहेर सर यांनी अध्यक्षीय मनोगतांमध्ये सांगितले की महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या तक्रारी व अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. द्वितीय सत्रामध्ये प्रमुख वक्ते म्हणून लाभलेल्या कराटे प्रशिक्षक कु.स्नेहल कांबळे ही विद्यार्थिनी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रशिक्षण किती महत्त्वाचे आहे हे सांगितले व तिची सहकारी तनुजा साळुंखे या दोघींनी कराटे या कौशल्या विषयाची माहिती दिली व काही प्रात्यक्षिके करून दाखविली.या कार्यशाळेसाठी संस्थेचे सचिव सन्माननीय वीरसिंह रणसिंग (भैय्या) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंकुशरावजी आहेर सर,उपप्राचार्य डॉ.अरुण कांबळे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .तसेच या कार्यशाळेसाठी श्री.छत्रपती महाविद्यालय भवानीनगर व श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालय बावडा या महाविद्यालयातून मोठ्या उत्साहाने प्राध्यापक व विद्यार्थिनींनी या कार्यशाळेमध्ये उपस्थित राहून सहभाग घेतला. या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख व सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यशाळेसाठी पत्रकार बाळासाहेब कवळे तसेच एकूण 110 विद्यार्थिनींनी उपस्थित होत्या.प्रमुख वक्त्याची ओळख प्रा.विद्या गुळीग यांनी करून दिली. या कार्यशाळेचे आभार प्रा.नम्रता सपकाळ यांनी मानले व या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा.सोनाली चव्हाण यांनी केले.

Related Post

error: Content is protected !!