Thu. Apr 23rd, 2026

मानकरवाडी ग्रामपंचायत उपसरपंचपदी कोमल धर्मेश थोरात बिनविरोध निवड

Spread the love

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

इंदापूर तालुक्यातील 26 ग्रामपंचायत पैकी मानकरवाडी ग्रामपंचायत वर आपला झेंडा फडकवला असून आज मानकरवाडी येथे उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडली ही प्रक्रिया सरपंच महादेव शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली , निरीक्षक व ग्रामसेवक घोळवे भाऊसाहेब यांच्या उपस्थितीत पार पडली. यामधे सौ. कोमल धर्मेश थोरात सर्वानुमते उपसरपंच पदी विनविरोध निवड करण्यात आली
नुतन ग्रामपंचायत सदस्य अनिकेत मोरे, सागर कणसे, अश्विनी सचिन यादव, पंकज यादव, रेखा शंकर गायकवाड व गौरी राजेंद्र जाधव आदिंच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली .
यावेळी पुणे जिल्हा सचिव तानाजीबापु थोरात, मा. उपसरपंच सुनील चव्हाण, सुनिल मोरे, संभाजी कणसे, सजिवन मोरे, दिलीप कणसे, हरीदास यादव, दशरथ मोरे, दिपक मोरे, अनिल तुपे, प्रशांत मानकर, विलास कणसे आदि उपस्थित होते. या उपसरपंच निवडीनंतर माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सरपंच व उपसरपंच यांना शुभेच्छा दिल्या व भविष्यात गावाच्या विकासासाठी लागेल ती मदत करण्यास तयार असल्याचे सांगितले. यानंतर मान्यवरांच्या उपस्थितिमध्ये सरपंच, उपसरपंच यांचा सन्मान करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Post

error: Content is protected !!