महाराष्ट्र शासनाचा अधिकारी “राहुल पारेकर “ग्रामपंचायत च्या प्रचारात!! बिजवडी गावच्या वार्ड क्र 5 मध्ये बॅनर झळकले
निवडणूक आयोग चौकशी करणार?
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
इंदापूर :- इंदापूर तालुक्यातील 26 ग्रामपंचायत ची निवडणूक प्रकिया सुरु असून येत्या रविवारी 18 नोव्हेंबर ला मतदान होणार आहे.
शिंदे -फडणवीस सरकाने जनतेतून (थेट सरपंच )चा निर्णय घेतला.
राज्य निवडणूक आयोगाने घटनेनुसार आचार सहिंता लागू केली.
महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार च्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रचाराच्या प्रक्रियेत सहभाग घेता येणार नाही, असा निवडणूक आयोगाचा ‘दंडक’आहे.तरी ही शिंदे -फडणवीस सरकार मधील शासकीय कर्मचारी बेधडक निवडणूक आयोगाच्या आदेशा चे उल्लंघन करीत असताना दिसत आहे.
अशातच इंदापूर तालुक्यातील बिजवडी ग्रामपंचायत ची सन 2022ते 2027ची पंचांवार्षिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीत वनगंळी या महासुली गावाचा वार्ड क्र 5आहे.
या वार्डात राष्ट्रवादी काँग्रेस पुरुस्कृत जय हनुमान जनसेवा पॅनल चे उमेदवार निवडणूक लढावीत आहेत.
यातच महाराष्ट्र शासनाचा जिल्हाधिकारी कार्यालयात (महसूल,मदत वं पुनर्वसन)विभागातील कर्मचारी वन गळी गावचा रहिवाशी आहे.राहुल पारेकर असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
त्यानेच गावातील अनेक मतदारांना पुनर्वसनच्या जमिनी मिळवून देण्याच्या अमिषावर “राजकीय पॅनल ‘तयार करून तीन उमेदवार प्रभाग क्र 5 मध्ये रिंगणात उतरले आहेत.
गावात घोंगडी बैठका घेणे, प्रचार रॅलीत सहभाग घेणे, प्रचाराचा नारळ फोडणे, मतदारांच्या वैयक्तिक गाठी भेटी घेणे, गावातील राजकीय पक्षांच्या पुढारी लोकांसामवेत प्रचार करणे, गावात वं वार्डात प्रचाराचे बॅनर लावणे, त्यावर स्वतः चे फोटो छापून मतदारावर प्रभाव टाकणे,या माध्यमातून तो कर्मचारी प्रचार करीत आहे.
ही बाब गंभीर असून या निवडणूक आयोग याची गंभीर दखल घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. सर्व प्रचार करीत असले बाबत पुरावे उपलब्ध असून नवीन आणखी संकलित करण्याचे काम सुरु आहे.
बिजवडी ग्रामपंचायत चे निवडणूक निर्णय अधिकारी, इंदापूर चे तहसीलदार, व जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाकडे सर्वां चे लक्ष लागून आहे.
निवडणूक आयोग याची गंभीर दखल घेत चौकशी करत असल्याची माहिती समोर येत आहे.
राहुल पारेकर या कर्मचाऱ्यावर शासकीय सेवेत पद आणि कर्तव्य त कसूर केल्या प्रकरणी वं आचार संहिता उल्लंघन प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता? असल्याची माहिती समोर येत आहे.
