Thu. Apr 23rd, 2026

रणसिंग महाविद्यालयाच्या माणुसकीची भिंत उपक्रमाचा गरजूंना आधार

Spread the love

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

कळंब ता. इंदापूर येथील विश्वासराव रणसिंग कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटना
यांच्या वतीने संस्थेचे सचिव वीरसिंह रणसिंग यांच्या वाढदिवसानिमित्त माणुसकीची भिंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चाळीस गोरगरीब ऊसतोड कामगार जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून या भागात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
माजी विद्यार्थी संघ संचालक मंडळ अध्यक्ष विरसिंह रणसिंग,उपाध्यक्ष प्रकाश कदम ,सचिव प्राचार्य डॉ. अंकुश आहेर,खजिनदार प्रा.ज्ञानेश्वर गुळीग,सदस्य श्रीनिवास फडतरे ,संदीप डोंबाळे ,सागर पाटील ,अक्षय कुलकर्णी ,मंगेश पाटील,सदस्या प्रा. डॉ. तेजश्री हुंबे ,सदस्या अनघा भोसले यांनी समाजातील सामान्य कुटूंबाला मदत व्हावी या उद्देशाने एक हात मदतीचा देत सामाजिक बांधिलकी च्या जाणिवेतून माणुसकी ची भिंत हा उपक्रम सुरु करण्याचा संकल्प केला.
माणुसकीची भिंत उपक्रमाचे दुसरे वर्ष असून इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव विरसिंह रणसिंग यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील गरजूंना व उसतोड कामगारांना जीवनावश्यक वस्तू ( अन्नधान्य , कपडे ,चप्पल ) चे वाटप इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान अध्यक्षा आनंदी रणसिंग, उपाध्यक्ष प्रकाश कदम , संस्था सचिव विरसिंह रणसिंग ,राही रणसिंग ,प्राचार्य अंकुश आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष विरसिंह रणसिंग यांनी माणुसकीची भिंत या उपक्रमाच्या माध्यमातून सामान्य कुटूंबातील व्यक्तीना मदतीचा हात दिल्याने कुटूंबातील व्यक्तीच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य अनमोल असून माजी विद्यार्थी संघाच्या विविध उपक्रमातून समाज उपयोगी कार्य कायमस्वरूपी सुरु राहणार असल्याचे सांगितले. महाविद्यालयात माणुसकीची भिंत उपक्रम संस्थेच्या माध्यमातून उपेक्षित गोरगरिबांना मदत व्हावी यासाठी सुरू केला आहे.परिसरातील ऊसतोड मजुरांना १८० साडी , शर्ट पॅंट ३०५ नग, लहान मुलांचे ३८२ नग कपडे चे वाटप
उस फडात जाऊन करण्यात येणार असल्याची माहिती इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे मुख्य सचिव विरसिंह रणसिंग यांनी दिली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आनंदी रणसिंग, उपाध्यक्ष प्रकाश कदम,खजिनदार हनमंतराव रणसिंग,विश्वस्त कुलदीप हेगडे,विश्वस्त शिवाजीराव रणवरे,विश्वस्त वीरबाला पाटील, राही रणसिंग यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.उपक्रमासाठी मगर क्लॉथ सेंटर नातेपुते,परेश क्लॉथ सेंटर वालचंदनगर यांचे सौजन्य लाभले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ.अंकुश आहेर ,उपप्राचार्य डॉक्टर अरुण कांबळे, मुख्याध्यापक महादेव वणवे,मारुती वणवे ,प्रा.डॉ.रामचंद्र पाखरे,डॉ.विजय केसकर, प्रा.डॉ. विलास बुवा,प्रा.डॉ.सुहास भैरट,प्रा.प्रशांत शिंदे, प्रा.ज्योत्स्ना गायकवाड ,प्रा.राजेंद्रकुमार डांगे,प्रा.विनायक शिंदे ,प्रा.ज्ञानेश्वर गुळीग ,प्रा.डॉ.तेजश्री हुंबे,प्रा. गणेश ठोंबरे, प्रा.अभिजीत शिंगाडे,प्रा ऱवि गायकवाड ,डॉ. बबन साळवे ,प्रा. नम्रता सपकळ, प्रा. महादेव माळवे,प्रा. कपिल कांबळे, प्रा. विद्या गुळीग , कर्मचारी दादा ढोपे ,सुभाष भंडलकर,मनोहर भादेकर, संतोष जाधव,संदीप सूर्यवंशी, इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Related Post

error: Content is protected !!