Thu. Apr 23rd, 2026

मराठी पत्रकार परिषदेच्या सर्वांच्या व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने पुणे जिल्हा पत्रकार संघाचे कामकाज एकजुटीने व अधिक जोमाने पुढे नेऊ – अध्यक्ष सुनिल लोणकर 

Spread the love

मराठी पत्रकार परिषदेच्या सर्वांच्या व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने पुणे जिल्हा पत्रकार संघाचे कामकाज एकजुटीने व अधिक जोमाने पुढे नेऊ – अध्यक्ष सुनिल लोणकर

*ऐतिहासिक अधिवेशन-२०२२*

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन मराठी पत्रकार परिषदेचे नेते, मुख्य विश्वस्त मा. एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक यांच्या नेतृत्वाखाली व मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांच्या अध्यक्षतेखाली थेरगाव, पिंपरी – चिंचवड येथे १९ व २० नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात व दिमाखात संपन्न झाले. येत्या काळात मा. एस. एम. देशमुख सर यांच्या नेतृत्वाखाली व विश्वस्त किरण नाईक व अध्यक्ष शरद पाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली, परिषदेच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने पुणे जिल्हा पत्रकार संघाचे कामकाज एकजुटीने व अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी आपणा सर्वांचा असाच उत्स्फुर्त सहभाग अपेक्षित असल्याचे मत पुणे जिल्हा पत्रकार परिषद संघाचे अध्यक्ष सुनिल लोणकर यांनी व्यक्त केले.

उद्घाटनप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, ज्येष्ठ पत्रकार खासदार कुमार केतकर, माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार अँड. अशोक पवार, न्युज अँकर विलास बडे, अश्विन बापट, रेश्मा साळुंखे, अनुपमा खानविलकर, निकीता पाटील, तर समारोपप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार रोहित पवार, आमदार आदिती तटकरे, आमदार महेशदादा लांडगे, ज्येष्ठ पत्रकार डॉ. समीरण वाळवेकर, सकाळचे संपादक सम्राट फडणीस, मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवी आंबेकर, ज्येष्ठ संपादक तुळशीदास भोईटे तसेच राजकीय, पत्रकारिता, सामाजिक, प्रशासकीय क्षेत्रातील अनेक वरीष्ठ मान्यवरांनी उपस्थित राहून पत्रकारिता आणि माध्यमांबाबत वैचारिक मंथन केले.

मा. एस. एम. देशमुख यांनी केलेल्या मागण्यांना प्रतिसाद देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही परीषदेच्या व्दैवार्षिक अधिवेशनासाठी २५ लाखांच्या मदतीची घोषणा करीत राज्यातील पत्रकारांचे विविध प्रश्न सोडवण्याचीही ग्वाही दिली. परिषदेच्या या दोन दिवसीय अधिवेशनात मार्गदर्शनासाठी आलेल्या सर्वच मान्यवरांचे तसेच अधिवेशनाला राज्य, जिल्हा, तालुक्यातून उत्स्फुर्तपणे उपस्थित राहिलेल्या सर्व पदाधिकारी व पत्रकार बांधवांचे पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. तर आदरातिथ्य, आयोजनात काही त्रुटी जाणवल्या असल्यास दिलगिरीही व्यक्त करतो.

या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलणार्‍या पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाच्या सर्वच टिम व त्यांना पाठबळ देणारे सर्व मान्यवर, परिषदेचे पदाधिकारी तसेच पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या सर्व सहकाऱ्यांना धन्यवाद देतो.
पुणे जिल्हा पत्रकार संलग्न सर्व तालुका पत्रकार संघाचे व सोशल मीडिया परिषदेचे अध्यक्ष व त्यांचे सहकारी यांनी अधिवेशनास उपस्थित राहून अधिवेशन यशस्वी होण्यासाठी हातभार लावला. त्या सर्वांचे मनःपूर्वक हार्दिक आभार…!
येत्या काळात मा. एस. एम. देशमुख सर यांच्या नेतृत्वाखाली व विश्वस्त किरण नाईक व अध्यक्ष शरद पाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली, परिषदेच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने पुणे जिल्हा पत्रकार संघाचे कामकाज एकजुटीने व अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी आपणा सर्वांचा असाच उत्स्फुर्त सहभाग अपेक्षित आहे!

Related Post

error: Content is protected !!