Thu. Apr 23rd, 2026

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारीसंघ(RMBKS )अंतर्गत PROTAN प्राध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी विंग- प्रोटानचे पुणे विभागीय अधिवेशन

Spread the love

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारीसंघ(RMBKS )अंतर्गत PROTAN प्राध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी विंग- प्रोटानचे पुणे विभागीय अधिवेशन

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS) प्रणित प्रोटान  PROTAN ( Professors, Teachers and Non-teaching Employees Wing ) ही राष्ट्रीय स्तरावरील मा. वामन मेश्राम साहेब यांच्या कुशल नेतृत्वात काम करणारी बहुजनांची एकमेव ट्रेड युनियन असून संघटनेच्या महाराष्ट्रातील 28 जिल्ह्यात 9 विद्यापीठात कार्यकारिणी असलेल्या प्रोटान ट्रेड युनियनचे पुणे विभागस्तरीय अधिवेशन रविवार, 18 सप्टेंबर 2022 रोजी सावित्रीबाई फुले सभागृह , गंजपेठ, पुणे येथे सकाळी 11 ते सायं 5 या वेळेत संपन्न होणार आहे.
या अधिवशनाचे उद्घाटन मा. प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण ,महाराष्ट्र राज्य पुणे यांचे हस्ते होणार आहे. या अधिवेशनासाठी विशेष अतिथी म्हणून मा. महेश पालकर, संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे, मा. शरद गोसावी, अध्यक्ष, एचएससी बोर्ड महाराष्ट्र राज्य पुणे; मा. सुयश दुसाने, प्रशासन अधिकारी, उच्च शिक्षण संचालनालय ,महाराष्ट्र राज्य पुणे; डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे; मा. मोनिका रंधवे, बालविकास प्रकल्प अधिकारी, पुणे नागरी, महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन; तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथील प्रा.डॉ. हर्ष जगझाप,राज्यशास्त्र विभागप्रमुख ; प्रा. संदेश जाडकर, भौतिकशास्त्र विभागप्रमुख, प्रा. डॉ. अविनाश आडे, वनस्पतीशास्त्र, विभागप्रमुख; प्रा. डॉ. राजेश गच्चे, माजीविभाग प्रमुख, जैव तंत्रज्ञान; प्रा.डॉ. एस एम राठोड, माजी अधिसभा सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या अधिवेशनामध्ये सरकारी, निम सरकारी क्षेत्राचे (महापारेषण,महावितरण, महानिर्मिती, बीएसएनएल, महानगरपालिका, रेल्वे, पोस्ट, एसटी महामंडळ, शिक्षण इत्यादी) खाजगीकरणाचे धोरण आणि नवीन शैक्षणिक धोरण 2020 हे बहुजन समाजाचे संविधानिक हक्क, अधिकार नष्ट करून त्यांचे भवितव्य उध्वस्त करून दीर्घ गुलाम करण्याचे शासक वर्गाचे षडयंत्र -एक गंभीर विश्लेषण तसेच डीसीपीएस/ एनपीएस धोरणाचे शिक्षक -प्राध्यापक बंधू भगिनी व बहुजन समाजाच्या कर्मचाऱ्यांच्या भविष्यावर होणारे परिणाम, कारणे आणि उपाय -गंभीर मंथन तसेच कामगार. कर्मचारी यांचे उद्देश आणि लक्ष्य केवळ ट्रेड युनियनची स्थापना करणे एवढ्या पुरते मर्यादित न ठेवता कामगार वर्गास शासक वर्ग बनवणे असला पाहिजे -डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि वरील षडयंत्राविरोधात निर्णायक लढा उभा करण्यासंदर्भात आर एम बी के एस -प्रोटानची भूमिका या विषयावर चर्चा होणार आहे .

या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा डॉ शमशुद्दीन तांबोळी तसेच टीकाराम जगन्नाथ महाविद्यालय खडकी पुणे येथील प्राचार्य डॉ संजय चाकणे हे प्रमुख वक्ते आहेत. या कार्यक्रमाची अध्यक्षता प्रा. गोरखनाथ वेताळ राष्ट्रीय महासचिव ,आर एम बी के एस तथा राष्ट्रीय प्रभारी प्रोटान, नवी दिल्ली हे करणार आहेत.
आज रोजी शासकवर्गाने कामगार आणि शिक्षकांसमोर अतिशय गंभीर व उग्र स्वरूपाच्या समस्या निर्माण केलेल्या आहेत. नविन शैक्षणिक धोरण 2020, शिक्षण हक्क कायदा 2009, स्वयंअर्थसहाय्यीत शाळा कायदा 2011, नवीन पेन्शन योजना या माध्यमातून प्राध्यापक, शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आणि कामगार कायद्यांमध्ये केलेल्या जाणिवपूर्वक बदलांच्या माध्यमातून शिक्षक व कामगार वर्गाचे वर्तमान धोक्यात आणून भविष्यही नष्ट केलेले आहे.न्यायपालिका, कार्यपालिका, संसद / विधिमंडळ आणि मिडीया यांच्यासह सर्व संविधानिक संस्थांवर शासक वर्गाचा ताबा असल्यामुळे या गंभीर समस्यांवर कोणीही बोलताना दिसून येत नाही. एवढेच नव्हे तर शासकवर्गाद्वारे प्रायोजित शिक्षक संघटनाही या विरोधात ठोस भूमिका घेताना व शिक्षक कर्मचारी वर्गामध्ये या षडयंत्राबाबत जागृती निर्माण करून या धोरणांविरोधात संघटीत शक्तीसह निर्णायक लढा उभारताना दिसून येत नाही.

जर समस्या मूलनिवासी बहुजन समाजातील कर्मचारी वर्गाच्या असतील तर त्या समस्येचे समाधानही बहुजन समाजालाच शोधावे लागेल, कारण जे समस्या निर्माण करतात ते कधीही त्या समस्यांचे समाधान करू शकत नाही. यासाठी संविधानिक मार्गाने लढा देणे गरजेचे आहे
कामगार कायदे हे कर्मचारी वर्गाचे सुरक्षा कवच आहेत. हे आपल्या डोळ्यादेखत नष्ट होताना पाहणे हे सूज्ञपणाचे लक्षण नाही. आणि बहुजन महापुरुषांचे वारस म्हणवून घेणाऱ्या आम्हास ते भूषणावहही नाही. त्यामुळे या षडयंत्राच्या विरोधात म्हणजेच शिक्षणाचे खासगीकरण, शिक्षण संपविण्याची प्रक्रिया व कामगार विरोधी अन्यायकारक धोरणांच्या विरोधात कायद्याच्या चौकटीत राहून संविधानिक मार्गाने संघटीत, सक्षम आणि निर्णायक लढा उभारण्यासाठी संघटनेच्या राज्य अधिवेशनाच्या तयारी अंतर्गत विभागीय अधिवेशने सर्व विभागात आयोजित केली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या अधिवेशनास बहुजन समाजातील अनेक मान्यवर, सन्माननीय अतिथी उपस्थित राहणार आहेत. या विभागीय अधिवेशनास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बरोबरच विभिन्न क्षेत्रातील सर्व कर्मचारी वर्गाने तन-मन-धनाने सहकार्य करून उपस्थित राहून सफल करावे असे आवाहन राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS) प्रणित प्रोटान {PROTAN (Professor, Teachers and Non-teaching Employees Wing )} च्या पुणे विभागस्तरीय पदाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Related Post

error: Content is protected !!