आमदार दत्तात्रय भरणे मामा व दत्तात्रय फडतरे आबा यांनी क्रिएटिव्ह अकॅडमीच्या राज्यस्तरीय डान्स स्पर्धेतील विजेतांचा केला सन्मान 
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
दि.4 : क्रिएटिव्ह अकॅडमी वालचंदनगर या ठिकाणी राज्यस्तरीय डान्स स्पर्धेत विजयी स्पर्धकांचा इंदापूर तालुक्याचे आमदार व माजी राज्यमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे व इंदापूर कृषी उत्पन बाजार समितीचे माजी सभापती दत्तात्रय (आबा) फडतरे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
फडतरे नॉलेज सिटीचे ड्रॉईंग शिक्षक कलावंत भिसे (सर) यांनी स्वतः रेखाटलेले भरणे (मामा) यांचे हुबेहूब चित्र मामांना प्रदान करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सपकळ,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष शुभम निंबाळकर, कळंब वि.का.सहकारी सोसायटीचे चेअरमन अभिजित खंडागळे, कळंब ग्रा.पं. सदस्या अश्विनी चव्हाण, समाधान राऊत (सर), फडतरे नाॅलेज सिटीच्या आय.टी.आय. चे प्राचार्य गणेश चव्हाण, आतार (सर), साळुंके (सर), रणजित राऊत, आदी मान्यवर, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
