पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कळंब (वालचंदनगर) शाखेचा वर्धापनदिन उत्साहात संपन्न
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
कळंब ( ता.इंदापूर ) दि. 5 : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधार व पाठबळ देण्याची भूमिका पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कायम ठेवली आहे. त्यामुळेच ग्रामीण भागातील सहकारी विकास सोसायटी व शेतकरी सधन आहेत. आगामी काळातही पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे मत कळंब विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन अभिजीत खंडागळे यांनी व्यक्त केले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कळंब ( वालचंदनगर ) शाखेचा 41 वा वर्धापनदिन सोमवार, दि. 5 रोजी कळंब शाखेत केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाखाप्रमुख स्वप्नील भोसले, जिल्हा बँकेचे इंदापूर तालुका समन्वयक प्रमोद मोरे, कॅशियर गणेश सिताप, विजय बनकर, संतोष सोनवणे, सुरज घोडके, विजय राऊत, प्रतिक कोंढळकर, कळंब सहकारी सोसायटीचे चेअरमन अभिजीत खंडागळे, सुहास वामन वाघ, अरूण चव्हाण, किसन शेंडगे, अर्जुन गुरूजी, दिपक चव्हाण, मिलिंद सावंत, विशाल रणमोडे, राहुल राऊत, सभासद व खातेदार, आदी उपस्थित होते.
