ग्रंथालयांना वार्षिक व लेखा परीक्षण अहवाल सादर करण्याचे आवाहन
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
पुणे, दि. 25: जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित सार्वजनिक ग्रंथालयांनी 2021-22 या आर्थिक वर्षाचे वार्षिक अहवाल 30 जून 2022 पर्यंत आणि लेखा परीक्षण अहवाल 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी दे. संगेपाग यांनी केले आहे.
मुदतीत वार्षिक अहवाल व लेखा परीक्षण अहवाल सादर न करणाऱ्या ग्रंथालयांना अनुदान वितरीत करण्यात येणार नसून त्याची सर्व जबाबदारी संबंधित ग्रंथालयाची राहील, असेही संगेपाग यांनी कळविले आहे.
