Thu. Apr 23rd, 2026

ग्रामपंचायतीचे कर्मचारी जि. प. च्या आरोग्य सेवेत कायम

Spread the love

ग्रामपंचायतीचे कर्मचारी जि. प. च्या आरोग्य सेवेत कायम

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

इंदापूर तालुक्यातील चार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना संवर्गाच्या सरळ सेवेच्या रिक्त पदावर आरोग्य सेवक म्हणून कायमस्वरूपी जिल्हा परिषदेत सामावून घेण्यात आल्याची माहिती राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघाचे सरचिटणीस ज्ञानदेव घोणे यांनी दिली.

निमगांव केतकी येथील कुंडलिक भाऊ भोंग, कळंब येथील शिवाजी हरिदास चव्हाण, पिटकेश्वर येथील सुखदेव विनायक भोसले, कौठळी येथील बाबासाहेब भगवान मोरे या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा यात समावेश असल्याचे श्रमिक संघाचे राजाध्यक्ष राजेंद्र वाव्हळ यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सामान्य प्रशासन विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे यांचे सहकार्य लाभल्याचे सरचिटणीस
घोणे यांनी सांगितले.

Related Post

error: Content is protected !!