Thu. Apr 23rd, 2026

भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधनाने सोमवारी सार्वजनिक सुट्टी” जाहीर !

Spread the love

भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधनाने सोमवारी सार्वजनिक सुट्टी” जाहीर !

सचिन तरंगे ( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळ दोन दिवस राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येत आहे.

महाराष्ट्र सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

या संदर्भात सरकारने काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कलाविश्वाची अपरिमित हानी झाली आहे.

या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

लता मंगेशकर यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

राष्ट्रीय दुखवट्याअंतर्गत ध्वज संहितेनुसार राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात आला आहे.

Related Post

error: Content is protected !!