भारतरत्न, गान कोकिळा लता मंगेशकर यांचे निधन
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
मुंबई : भारताची गान कोकिळा लता मंगेशकर यांचे आज रविवार, दि. 6 फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्या 92 वर्षाच्या होत्या. लता मंगेशकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील ब्रीज कँडी रूग्णालयात उपचार सुरू होते.
गेल्या महिन्याभरापासून त्या रूग्णालयात उपचार घेत होत्या. मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा दिसून येत नव्हती. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
